Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara : वाईच्या आठवडी बाजारात अस्वच्छ पाण्यात भाजी धुण्याचा प्रकार; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Satara : वाई शहरातील सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात नदीपात्रातील अस्वच्छ पाण्यात भाजी धुतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 10, 2026 | 06:37 PM
satara news

satara news

Follow Us
Follow Us:

वाई : वाई शहरातील आठवडी बाजाराच्या दिवशी सोमवारी गणपती मंदिराशेजारील पुलाच्या खालच्या बाजूस नदीपात्रात अस्वच्छ पाण्यामध्ये भाजी धुण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी आठवडी बाजार भरत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. याच पार्श्वभूमीवर नदीपात्रात एका व्यक्तीकडून अस्वच्छ पाण्यामध्ये भाजी धुतली जात असल्याचे दिसून आले.

नदीपात्रातील पाण्याची स्वच्छता आणि त्यामध्ये असलेली घाण लक्षात घेता अशा पाण्याचा भाजी धुण्यासाठी वापर होत असल्याने त्या भाज्यांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

भाजीपाला थेट नागरिकांच्या आहारात वापरला जात असल्याने तो कोणत्या पाण्यात धुतला जातो, त्याची स्वच्छता कशी केली जाते आणि विक्रीपूर्वी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेतली जाते का, याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

मोती चौकातील दुभाजक वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढला

विशेष म्हणजे, गणपती मंदिर परिसर आणि पुलालगतचा नदीपात्राचा भाग नागरिकांच्या वर्दळीचा असून, आठवडी बाजाराच्या दिवशी येथे मोठी गर्दी असते. अशा ठिकाणी उघडपणे अस्वच्छ पाण्यात भाजी धुतली जात असतानाही संबंधित प्रशासनाचे लक्ष का गेले नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अन्न व भाजीपाला विक्रीशी संबंधित स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच नदीपात्राचा अशा प्रकारे वापर करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वाई शहरातील आठवडी बाजारात विक्री होणाऱ्या भाजीपाल्याची स्वच्छता, विक्रेत्यांकडून वापरले जाणारे पाणी आणि बाजार परिसरातील स्वच्छता यांची संबंधित विभागाने तपासणी करून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

मल्हारपेठच्या विकासकामांची घोडदौड; पालकमंत्र्यांच्या पाठबळातून सरपंचांच्या कार्याचा जलवा,रस्त्यांसह मूलभूत सुविधांना प्राधान्य

Web Title: Wai weekly market vegetables washed dirty water health concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Wai

संबंधित बातम्या

Mudhaidevi Navratri Ashtami: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देऊरची मुधाई देवी!; अष्टमीच्या मुख्य दिनी राज्यभरातून भाविकांची गर्दी
1

Mudhaidevi Navratri Ashtami: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देऊरची मुधाई देवी!; अष्टमीच्या मुख्य दिनी राज्यभरातून भाविकांची गर्दी

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
2

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
3

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध
4

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.