Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ

Rohit Pawar : सुनेत्रा पवारांना राज्याचे अर्थमंत्रिपद मिळण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अजित पवारांनंतर अर्थखातं राष्ट्रवादीकडून काढून घेतल्याचा आरोप करत त्यांनी शेतकरी मदतीवरूनही सरकारला अल्टिमेटम दिला.

  • By विवेक
Updated On: Oct 17, 2026 | 05:13 PM
Rohit pawar on Sunetra Pawar

Rohit pawar on Sunetra Pawar

Follow Us
Follow Us:
  • सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही? रोहित पवारांचा मोठा दावा
  • शेतकऱ्यांच्या मदतीवरून रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
  • तुकाराम मुंढेंच्या तपासावर रोहित पवारांचा विश्वास
 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडील अर्थमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. या अर्थमंत्रीपदावरून आता महायुतीत धुसफूस सुरु असल्याचे चित्र दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थमंत्रीपद पुन्हा मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांकडे मागणी केली आहे. मात्र अद्यापही राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळू शकलेले नाही.

यावरूनच, रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रीपद मिळणार नसल्याचे म्हंटले आहे. “मी भाजपला फार ओळखतो. सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रीपद मिळणार नाही. त्यामुळेच मी भाजपपासून लांब आहे,” अश्या शब्दांत त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही. भाजपला मी फार ओळखतो, त्यामुळे मी भाजपपासून लांब आहे. अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रिपद चोरून घेतलेलं आहे,’ असा आरोप रोहित पवार यांनी केला. अजितदादांना त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून आणि भाजपकडूनही न्याय मिळाला नाही, असंही ते म्हणाले.

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकबाबत ओवैसींची भूमिका चर्चेत!

शेतकरी मदतीवरून सरकारला अल्टिमेटम

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवरूनही रोहित पवार यांनी सरकारला सुनावलं. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

“शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करा, अन्यथा तुम्हाला दिवाळी साजरी करू देणार नाही,” असा इशारा त्यांनी सरकारला दिला. पाच हजार रुपयांची मदत देऊन सरकार शेतकऱ्यांना गृहीत धरत असल्याची टीकाही त्यांनी केली. एमपीएससी आंदोलन आणि मतदारसंघातील दौऱ्यानंतर आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सक्रिय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तुकाराम मुंढेंच्या तपासावर विश्वास

दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि संबंधित नियुक्त्यांच्या चौकशीबाबत रोहित पवार यांनी भूमिका मांडली. “आमचा तुकाराम मुंढे यांच्यावर विश्वास आहे. विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेऊन पुरावे सादर करावेत. चौकशीतून सत्य समोर यावं आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अर्थखात्याचा तिढा, शेतकरी मदतीचा प्रश्न आणि चौकशीची मागणी या तीन मुद्द्यांवरून रोहित पवार यांनी सरकारला लक्ष्य केल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळण्याबाबत रोहित पवार काय म्हणाले?

    Ans: सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्रिपद मिळणार नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.

  • Que: सध्या महाराष्ट्राचे अर्थमंत्रिपद कोणाकडे आहे?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्रिपदाची जबाबदारी स्वतःकडे ठेवली आहे.

  • Que: शेतकरी मदतीबाबत रोहित पवारांनी काय इशारा दिला?

    Ans: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, अन्यथा सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Sunetra pawar finance ministry rohit pawar bjp allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • NCP Party
  • rohit pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

‘विरोध केल्यास खलास करू’; राष्ट्रवादीच्या आमदाराला धमकीचे पत्र, समान नागरी कायद्यावरून मोठी खळबळ!
1

‘विरोध केल्यास खलास करू’; राष्ट्रवादीच्या आमदाराला धमकीचे पत्र, समान नागरी कायद्यावरून मोठी खळबळ!

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश
2

अजितदादांच्या ‘ग्राउंडवर्क’चा राष्ट्रवादीला मोठा फायदा! सोमेश्वरच्या निवडणुकीत विरोधकांना रोखण्यात सुनेत्रा पवारांना यश

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
3

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
4

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.