Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानासाठी पुढाकार; कर्जतच्या भालिवडीत साकारली आधुनिक ‘पिंक रूम’

कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या आरोग्य, सुरक्षितता आणि आत्मसन्मानासाठी विशेष ‘पिंक रूम’ची उभारणी करण्यात आली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास विभागाचे सचिव विकास वाघमारे यांच्या हस्ते झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2026 | 03:13 PM
विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानासाठी पुढाकार; कर्जतच्या भालिवडीत साकारली आधुनिक ‘पिंक रूम’

विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानासाठी पुढाकार; कर्जतच्या भालिवडीत साकारली आधुनिक ‘पिंक रूम’

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानासाठी पुढाकार
  • भालिवडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत पिंकरूम..
  • मुलींच्या सुरक्षितता आणि आत्मसन्मान यांच्यासाठी विशेष खोली
कर्जत : कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळेत मुली शिक्षण घेतात.या शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलींच्या आत्मसन्मान आणि आरोग्य सुरक्षितता यांच्यासाठी खास पिंक रूम बनवण्यात आली आहे.दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प यांच्याकडून राबवण्यात आलेल्या पिंकरूम बद्दल मोठी उत्सुकता राज्यभर निर्माण झाली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या वतीने कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील मुलींच्या शासकीय आश्रमशाळेत पिंक रूम बनवण्यात आले आहे. या पिंक रूमचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव विकास वाघमारे यांचे हस्ते झाले.यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती नारायण डामसे,आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गोपीचंद कदम आणि आदिवासी विकास मंत्र्यांचे खाजगी सचिव ललित कुमार वराडे तसेच जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे,प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे आदी उपस्थित होते. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे मार्गदर्शना खाली आदिवासी विकास विभागाच्य शासकीय आश्रमशाळेत असा उपक्रम पहिल्यांदा राबवण्यात आला आहे.

४ किमी पायपीट करून पाणी आणण्याची वेळ; नळपाणी योजना बंद; कर्जतच्या चाहूचीवाडीत आदिवासींवर पाणीटंचाईचे संकट

पिंक रूम” ची संकल्पना साकारली असून भालिवडी शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या अत्यंत संवेदनशील काळात हक्काचा आराम, स्वच्छता, आणि मानसिक बळ मिळावे या उद्देशाने वसतिगृहातील एका स्वतंत्र खोली निर्माण करण्यात आली.ही पिंक रूम अत्यंत सुसज्ज आणि सुंदर स्वरूप देण्यात आले आहे. या पिंक रूम सुरक्षित वाटावी अशी रचना करण्यात आली असून मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तेथे आरामदायी बेड, गरम पाण्याची पिशवी (हिटिंग जेल बॅग), आणि पिण्याच्या गरम पाण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. यासोबतच प्रथमोपचार आणि औषध पेटी, आणि वजन काटाही ठेवण्यात आला आहे.केवळ भौतिक सुविधांवर न थांबता, मुलींमध्ये आरोग्यविषयक साक्षरता निर्माण करण्यासाठी या खोलीत ‘मासिक पाळीत काय करावे आणि काय करू नये’ याचे माहितीफलक लावण्यात आले आहेत.

तसेच ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ (गुड टच-बॅड टच) याविषयी जनजागृती करणारे फलक, या काळात करायचे योग्य व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेणारे मार्गदर्शनही अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. मुलींचे मनोधैर्य वाढवण्यासाठी येथे इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांसारख्या महान व प्रेरणादायी स्त्रियांची पुस्तके असलेले छोटे ग्रंथालय उभारण्यात आले आहे. बालविवाह प्रतिबंध, सोशल मीडियाची सुरक्षितता आणि सर्व महत्त्वाचे आपत्कालीन हेल्पलाइन नंबर एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊन ही खोली मुलींसाठी खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित कवच’ बनली आहे. या कार्यक्रमात भालिवडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत उभारण्यात आलेल्या डिजिटल पॅनल वर्गांचे तसेच टॅब रूमचे उद्घाटन सुद्धा आदिवासी विकास विभागाचे सचिव वाघमारे यांचे हस्ते करण्यात आले.

रानावनांतून आलेल्या या आदिवासी कन्या आपल्या डोळ्यांत स्वप्नांचे मोती घेऊन जेव्हा शाळेच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम या ‘पिंक रूम’च्या माध्यमातून पेण प्रकल्पाने केले आहे. हा उपक्रम आगामी काळात संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरेल यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी दिली.

KARJAT: कर्जतमधील 99 एकर सरकारी जमीन टोरंट कंपनीला; शिवसेनेचा तीव्र विरोध

Web Title: Bhaliwadi tribal girls ashram school pink room initiative karjat news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • education
  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

NCERT Book Controversy: ९ वीच्या नव्या पुस्तकात सिंधू संस्कृतीतील ‘Dancing Girl’ चा फोटो बदलला; धड झाकल्याने तज्ज्ञांचा आक्षेप
1

NCERT Book Controversy: ९ वीच्या नव्या पुस्तकात सिंधू संस्कृतीतील ‘Dancing Girl’ चा फोटो बदलला; धड झाकल्याने तज्ज्ञांचा आक्षेप

४ किमी पायपीट करून पाणी आणण्याची वेळ; नळपाणी योजना बंद; कर्जतच्या चाहूचीवाडीत आदिवासींवर पाणीटंचाईचे संकट
2

४ किमी पायपीट करून पाणी आणण्याची वेळ; नळपाणी योजना बंद; कर्जतच्या चाहूचीवाडीत आदिवासींवर पाणीटंचाईचे संकट

KDMC News : आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी
3

KDMC News : आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी

Census Employee Insurance: जनगणनेच्या कामात शिक्षक, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात? आता शासनाकडे विशेष विम्याची होतेय मागणी
4

Census Employee Insurance: जनगणनेच्या कामात शिक्षक, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात? आता शासनाकडे विशेष विम्याची होतेय मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.