४ किमी पायपीट करून पाणी आणण्याची वेळ; नळपाणी योजना बंद; कर्जतच्या चाहूचीवाडीत आदिवासींवर पाणीटंचाईचे संकट
KARJAT: कर्जतमधील 99 एकर सरकारी जमीन टोरंट कंपनीला; शिवसेनेचा तीव्र विरोध
कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो.कळंब ग्रामपंचायत मधील चाहुचीवाडी या आदिवासी वाडीसाठी असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत.या वाढीसाठी राबवण्यात येत असलेली नळपाणी योजना बंद पडली आहे.तर नवीन जलजीवन मिशनच्या नळपाणी योजनांच्या कामाला खीळ बसला आहे.या वाडीतील तरुणांनी मागील वर्षी वाडीच्या पायथ्याशी असलेल्या कूपनलिकेतून पाणी उचलून जलवाहिनी द्वारे वाडीत आणले होते.मात्र त्या जलवाहिनी तून देखील पाणी वाडीत पोहचत नसल्याने आदिवासी लोकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. सध्या येथील आदिवासी महिला आणि काही पुरुष देखील पिण्याचे पाणी आणण्यासाठी मुरबाड तालुक्यातील गेटाचीवाडी वाडी येथे जाऊन पाणी आणत आहेत. या आदिवासी वाडीमध्ये सौर पंप असलेल्या कूपनलिकेतून मिळणारे पाणी चहूची वाडीत आणण्यासाठी चार किलोमीटर प्रवास करावा लागत आहे.त्यात हा प्रवास मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने सुरू असतो.
पाण्याची टंचाई वाढल्याने येथील महिलांची सकाळ पाण्याचे हांडे घरातून घेऊन गेटाची वाडी असा प्रवास याने होत आहे.महिला सकाळी आठ वाजता या आदिवासी वाडीतुन पाणी आणण्यासाठी निघतात. जावे लागते. मुरबाड तालुक्यातील गेटाचीवाडी या आदिवासी वाडीमध्ये सौर पंप या ठिकाणी देखील तासभर थांबावे लागते.त्यानंतर या महिलांना चार ते पाच हांडे भर पाणी मिळते आणि नंतर या महिला ते पाणी घेऊन मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरून पायपीट करून घराकडे येत असतात वाडीतील महिला यांना आपल्या घरातील पशु पक्षी जनावरे यांच्यासाठी देखील पाणी न्यावे लागते.तर आठवड्याचे कपडे या वाडीमधील महिलांना कळंब नेरळ रस्त्यावरील उल्हास नदी येथील दहिवळी पूल येथे जाऊन धुवून आणावे लागतात. त्यासाठी देखील येथील आदिवासी लोकांना खास रिक्षा करून कपडे घेऊन नदी गाठावी लागते.ही नदी चाहूची वाडी येथून १३ किलोमीटर अंतरावर असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड आदिवासी लोकांना सहन करावा लागत आहे.
शासनाने आमच्या वाडीतील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तत्काळ टँकर सुरू करावा अशी मागणी आहे.आमच्या संयमाची प्रतीक्षा सरकारने पाहू नये आणि टँकर सुरू केला नाही तर आम्ही राष्ट्रीय महामार्गावर बसून रस्ता अडवण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक महिला कमळी ढोले यांनी दिली.






