Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

४ किमी पायपीट करून पाणी आणण्याची वेळ; नळपाणी योजना बंद; कर्जतच्या चाहूचीवाडीत आदिवासींवर पाणीटंचाईचे संकट

Karjat Water Crisis : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहूचीवाडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाडीतील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्याने आणि जुनी नळपाणी योजना बंद पडल्याने आदिवासी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ४ किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2026 | 02:42 PM
४ किमी पायपीट करून पाणी आणण्याची वेळ; नळपाणी योजना बंद; कर्जतच्या चाहूचीवाडीत आदिवासींवर पाणीटंचाईचे संकट

४ किमी पायपीट करून पाणी आणण्याची वेळ; नळपाणी योजना बंद; कर्जतच्या चाहूचीवाडीत आदिवासींवर पाणीटंचाईचे संकट

Follow Us
Follow Us:
  • चाहूची वाडी मधील महिलांची पाण्यासाठी चार किलोमीटर पर्यंत पायपीट
  • महिलांना दिवसभर पाण्याचे हंडे वाहून नेण्याची वेळ
  • टँकर सुरू करण्याची मागणी
कर्जत : कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत मधील चाहूचीवाडी येथील नळपाणी योजना बंद पडली आहे.येथील नवीन नळपाणी योजना अर्धवट असल्याने येथील आदिवासी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेटाची वाडी येथे जाऊन पाणी आणावे लागत आहे. दरम्यान रखरखत्या उन्हात हे आदिवासी लोक पाण्याने भरलेले हांडे वाहून नेत असल्याचे चित्र मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग वरून येणारे जाणारे यांच्या नजरेत पडत आहे.दरम्यान शासनाचे वतीने टँकर सुरू करण्यात यावे अशी मागणी आदिवासी ग्रामस्थ कमळी वामन ढोले यांनी केली आहे.

KARJAT: कर्जतमधील 99 एकर सरकारी जमीन टोरंट कंपनीला; शिवसेनेचा तीव्र विरोध

कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो.कळंब ग्रामपंचायत मधील चाहुचीवाडी या आदिवासी वाडीसाठी असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत.या वाढीसाठी राबवण्यात येत असलेली नळपाणी योजना बंद पडली आहे.तर नवीन जलजीवन मिशनच्या नळपाणी योजनांच्या कामाला खीळ बसला आहे.या वाडीतील तरुणांनी मागील वर्षी वाडीच्या पायथ्याशी असलेल्या कूपनलिकेतून पाणी उचलून जलवाहिनी द्वारे वाडीत आणले होते.मात्र त्या जलवाहिनी तून देखील पाणी वाडीत पोहचत नसल्याने आदिवासी लोकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. सध्या येथील आदिवासी महिला आणि काही पुरुष देखील पिण्याचे पाणी आणण्यासाठी मुरबाड तालुक्यातील गेटाचीवाडी वाडी येथे जाऊन पाणी आणत आहेत. या आदिवासी वाडीमध्ये सौर पंप असलेल्या कूपनलिकेतून मिळणारे पाणी चहूची वाडीत आणण्यासाठी चार किलोमीटर प्रवास करावा लागत आहे.त्यात हा प्रवास मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने सुरू असतो.

पाण्याची टंचाई वाढल्याने येथील महिलांची सकाळ पाण्याचे हांडे घरातून घेऊन गेटाची वाडी असा प्रवास याने होत आहे.महिला सकाळी आठ वाजता या आदिवासी वाडीतुन पाणी आणण्यासाठी निघतात. जावे लागते. मुरबाड तालुक्यातील गेटाचीवाडी या आदिवासी वाडीमध्ये सौर पंप या ठिकाणी देखील तासभर थांबावे लागते.त्यानंतर या महिलांना चार ते पाच हांडे भर पाणी मिळते आणि नंतर या महिला ते पाणी घेऊन मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरून पायपीट करून घराकडे येत असतात वाडीतील महिला यांना आपल्या घरातील पशु पक्षी जनावरे यांच्यासाठी देखील पाणी न्यावे लागते.तर आठवड्याचे कपडे या वाडीमधील महिलांना कळंब नेरळ रस्त्यावरील उल्हास नदी येथील दहिवळी पूल येथे जाऊन धुवून आणावे लागतात. त्यासाठी देखील येथील आदिवासी लोकांना खास रिक्षा करून कपडे घेऊन नदी गाठावी लागते.ही नदी चाहूची वाडी येथून १३ किलोमीटर अंतरावर असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड आदिवासी लोकांना सहन करावा लागत आहे.

शासनाने आमच्या वाडीतील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तत्काळ टँकर सुरू करावा अशी मागणी आहे.आमच्या संयमाची प्रतीक्षा सरकारने पाहू नये आणि टँकर सुरू केला नाही तर आम्ही राष्ट्रीय महामार्गावर बसून रस्ता अडवण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक महिला कमळी ढोले यांनी दिली.

Karjat News : ‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा

Web Title: Karjat chahuchiwadi tribal village water crisis demand for tanker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Karjat
  • raigad
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Karjat: मिरचोलीत आदिवासी जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप; बेकायदेशीर कंपाऊंड हटवण्याची मागणी
1

Karjat: मिरचोलीत आदिवासी जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप; बेकायदेशीर कंपाऊंड हटवण्याची मागणी

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला
2

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी
3

Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी

Raigad News: गोदरेज कंपनीतील स्थानिकांच्या हितासाठी ठाकरे गट मैदानात; कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार
4

Raigad News: गोदरेज कंपनीतील स्थानिकांच्या हितासाठी ठाकरे गट मैदानात; कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.