कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी या ग्रामपंचायत मध्ये टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे.या खासगी कंपनीच्या प्रकल्पासाठी वन विभागानंतर आता राज्य सरकार ने पायघड्या घातल्या आहेत. राज्य सरकारने आपली महसूल मधील 99 एकर जमीन 30 वर्षाच्या भाडेतत्वावर टोरंट कंपनीला विकली आहे. खासगी कंपनीला अशी सरकारी जमीन घशात घालण्याचा प्रयत्न पाहता राज्य सरकार गुजरात राज्यातील टोरंट कंपनीसाठी काम करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी केला आहे. तर तालुक्यातील टोरंट,पोशीर आणि शिलार या प्रकल्पाबाबत जागतिक पर्यावरण दिनी पाच जून रोजी कर्जत तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने मोर्चा काढण्याचा इशारा आणि निर्णय जाहीर केला आहे.