Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: अतिवृष्टीने ३० किमी रस्त्यांची चाळण! पावसाचा फटका; दुरुस्तीसाठी १७ कोटींचा निधी मंजूर

भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३० किमी रस्त्यांची दुरवस्था झाली असून शासनाकडून १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करून वाहतूक पूर्ववत केली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 05, 2026 | 03:32 PM
Bhandara News: अतिवृष्टीने ३० किमी रस्त्यांची चाळण! पावसाचा फटका; दुरुस्तीसाठी १७ कोटींचा निधी मंजूर
Follow Us
Follow Us:
  • जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३० किलोमीटर रस्त्यांची दुरवस्था झाली असून दुरुस्तीसाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
  • सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करून खड्डे बुजवले असून बाधित मार्गांवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
  • रस्त्यांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभालीसाठी विभागाने शासनाकडे अतिरिक्त ९६ कोटी रुपयांच्या निधीचा नवा प्रस्ताव पाठवला आहे.

जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे ३० किमी रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्ग, राज्य महामार्ग रस्त्यांची चाळण झाली आहे. दीड ते दोन फुटांचे पडलेले खड्डे पाहता राज्य महामार्ग आहेत की पांदण रस्ता, असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यांच्या तत्काळ दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अत्यंत प्राधान्याने कार्यरत आहे. प्राप्त माहितीनुसार नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील तरुण बांगलादेशातील कारागृहात; राष्ट्रीयत्व पडताळणीसाठी पोलिसांची धावपळ

९६ कोटींच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल

८८ अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून पाहणी करून ९६ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. निधी प्राप्त होताच युद्धापातळीवर रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येतील. सध्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरती डागडुजी केली जात आहे. – अभिजित कुचेवार, कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग, भंडारा. कारधा-खमारी रस्त्याला पुराचा फटका; या अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यातील काही मार्गावर पुलावरून पाणी गेल्याने रस्ते क्षतिग्रस्त झाले होते.

यामध्ये कारधाखमारी रस्ता (किमी ६/४००) येथील खमारी गावाजवळील नाल्यावरून पाणी वाहून गेल्याने काही काळ संपर्क तुटला होता. मात्र, प्रशासनाकडून तातडीने दखल घेऊन सदर रस्ता व पुलाची स्थिती पूर्ववत करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्ह्यातील जनतेला सुखकर, सुरक्षित आणि विनाअडथळा वाहतूक व्यवस्था देण्यासाठी सतत कटिबद्ध असून, आपत्कालीन परिस्थितीतही यंत्रणा सतर्क असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Bhandara News: दोन ट्रकची समोरासमोर धडक, वाहकाचा मृत्यू; कोरंभी परिसरातील बायपास मार्गावरील घटना

सर्वेक्षण आणि देखभाल-दुरुस्तीचे कार्य सुरू

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळोवेळी जिल्ह्यातील रस्त्यांचे सर्वेक्षण व पाहणी करण्यात येते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी विशेष प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवले जातात व ते तातडीने मंजूर करून घेतले जातात. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि इतर दुरुस्तीची कामे एएमसीअंतर्गत मंजूर असल्याने, युद्धपातळीवर खड्डे बुजवून रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी सुरळीत करून देण्यात आले आहेत. तसेच, एएमसीची कामे कशा पद्धतीने करावीत याबाबत वरिष्ठांकडून वेळोवेळी योग्य त्या सूचना व मार्गदर्शन प्रशिक्षणही देण्यात येते. चालू वर्षात भंडारा जिल्ह्यासाठी रस्ते देखभाल व दुरुस्तीअंतर्गत तब्बल १७०० लाख (१७कोटी) रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यातील खराब व क्षतिग्रस्त रस्त्यांची डागडुजी केली जात आहे.

अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहनांचे नुकसान

चाळण झालेल्या रस्त्यांमुळे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी खड्डयांचा अंदाज घसरून पडत असून गंभीर जखमी होत आहेत. तसेच खोल खड्डयांमुळे चारचाकी व जड वाहनांचे सॉक अॅब्जॉर्बर, टायर व इतर सुटे भाग खराब होऊन वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

Web Title: Bhandara heavy rain road damage pwd repair funds approved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Bad Roads
  • Bhandara
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.