Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: जिल्ह्या तब्बल २८८ ‘एक शिक्षकी’ शाळा! एका शिक्षकाकडे ४ वर्गांचा भार; रिक्तपदांचा अनुशेष वाढतीवर

गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ९१० शिक्षकांची पदे रिक्त असून तब्बल २८८ शाळा एकाच शिक्षकाच्या भरवशावर सुरू आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून संतप्त पालकांनी व शिक्षक संघाने तातडीने भरती करण्याची मागणी केली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 06, 2026 | 07:42 PM
Gondiya News: जिल्ह्या तब्बल २८८ ‘एक शिक्षकी’ शाळा! एका शिक्षकाकडे ४ वर्गांचा भार; रिक्तपदांचा अनुशेष वाढतीवर
Follow Us
Follow Us:
  • गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची ९१० पदे रिक्त असून २८८ शाळा एकाच शिक्षकावर चालवल्या जात आहेत.
  • २०१९ मध्ये बंदी उठवून ‘पवित्र’ पोर्टल सुरू केल्यानंतरही नियमित शिक्षक भरती न झाल्यामुळे रिक्त पदांची समस्या गंभीर बनली आहे.
  • गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने दर्जेदार सुविधांसह भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी पालकांची मागणी आहे.

राज्यात २०११ पासून शिक्षक भरतीवर असलेली बंदी २०१९ मध्ये उठविण्यात आली. मात्र, त्यानंतर तब्बल सहा वर्षे उलटूनही नियमित शिक्षक भरती न झाल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ९१० शिक्षकांची पदे अद्याप रिक्त आहे. याशिवाय जिल्ह्यातील तब्बल २८८ शाळा एकाच शिक्षकाच्या भरवशावर सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून, पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली.

शासनाच्या विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर (पीटीआर) नियमानुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात येते. या निकषानुसार मंजूर असलेल्या पदांपैकी जिल्ह्यात सध्या ९१० पदे रिक्त आहे.

२०१९ मध्ये ‘पवित्र’ पोर्टल सुरू करून भरती ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. राज्यभरातील सुमारे पावणेदोन लाख डीएड व बीएडधारक उमेदवारांनी ही परीक्षा दिली.

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मात्र, त्यानंतर केवळ चार ते पाच हजार उमेदवारांनाच नियुक्त्या देण्यात आल्या. सध्या कार्यरत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी रिक्त पदांचे रोस्टरही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, नव्या शिक्षक भरतीबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे. केवळ २ हजार ६१७ पदांवर शिक्षक कार्यरत असून ९१० पदे रिक्त आहे. त्यामुळे कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकाला सर्व वर्गाचा कारभार सांभाळावा लागत आहे.

शाळांमधील शिक्षकांची पदे भरण्यात यावी, खासगी शाळांप्रमाणे गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण द्यावे, प्रत्येक पालक खासगी शाळांला मुलांचा प्रवेश घेऊ शकत नाही. त्यामुळे शासन प्रशासनाने जिप शाळांमध्ये उत्तम सुविधा देण्यावर भर द्यावा.

राजकुमार भाजीपाले, पालक, झांजिया. पटसंख्या २० पेक्षा कमी असलेल्या शाळा बंद झाल्यास तेथील शिक्षकांचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्यात येणार आहे। चोथे रिक्त जागा उपलब्ध विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही जवळच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, शिक्षकांची रिक्त पदे ‘पवित्र’ पोर्टलद्वारे भरण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. – पवन, खंडारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया.

खेळ, संवाद आणि कृतीतून गणिताची गोडी; बालभारतीचे चौथीचे नवे पुस्तक विद्यार्थ्यांच्या भेटीला

अनुदानित शाळा, अनुदानित व शासकीय आश्रमशाळांमधील रिक्त पदांचा विचार करता ५० हजारांहून अधिक शिक्षकांची कमतरता असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ५२७ शिक्षकांची पदे मंजूर आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये गरीब, सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षक भरतीला प्राधान्य द्यावे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. यशोधरा सोनेवाने, अध्यक्ष, म. रा. प्रा. शिक्षक संघ.

जि.प. शाळांमध्ये कॉन्व्हेंटच्या शासन प्रशासनाने करावा. गोरगरीब पालकांना खासगी शाळांत मुलांना शिकविणे आवाक्याबाहेर असते. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे भ्ररण्यात यावी, दर्जेदार शिक्षण देण्यात यावे, अशी अपेक्षा आहे. देवेंद्र दमाहे, पालक, भडंगा.

Web Title: Gondia zp schools face severe teacher shortage 910 posts vacant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • Bhandara
  • maharashtra
  • Schools

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.