Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव रखडला! प्रस्तावात कोणतेही स्पष्टीकरण नाही, प्रकल्पासाठी सल्लागाराच्या नियुक्तीवरून वाद

भांडुप जलशोधन केंद्राची स्थापना वर्ष १९७८ मध्ये झाली होती. मात्र, गेली अनेक वर्षे सातत्याने रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे या केंद्राची इमारत आणि अंतर्गत रचना आता अत्यंत कमकुवत झाली असून तिचे आयुर्मान संपत आले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 23, 2026 | 12:01 PM
भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव रखडला! प्रस्तावात कोणतेही स्पष्टीकरण नाही, प्रकल्पासाठी सल्लागाराच्या नियुक्तीवरून वाद

भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव रखडला! प्रस्तावात कोणतेही स्पष्टीकरण नाही, प्रकल्पासाठी सल्लागाराच्या नियुक्तीवरून वाद

Follow Us
Follow Us:

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्राच्या पुनर्विकासाच्या कामात आता सल्लागाराच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या तांत्रिक देखरेखीसाठी ‘मेसर्स टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लिमिटेड’ यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा आणि त्यांना कोट्यवधी रुपयांचे शुल्क देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीत रखडला आहे. विरोधकांनी या प्रस्तावातील आर्थिक गणितांवर तीव्र आक्षेप घेतल्यामुळे पालिका प्रशासनाची कोंडी झाली आहे. सुमारे १२३५ कोटींच्या या प्रकल्पाच्या तांत्रिक निरीक्षणासाठी टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्सला सल्लागार नियुक्त करून त्यांना ९.२६ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला होता.(फोटो सौजन्य – AI)

‘कोणतीही घोषणा नाही, कोणतीही मदत नाही’; मेट्रो-३ बंद पडल्याने मुंबईकर संतापले; सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

पालिकेने वाढीव रकमेचा हिशेब द्यावा

या प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या १ टक्का म्हणजेच १२ कोटी ३५ लाख रुपये सल्लागाराला दिले जाणार आहेत, ज्यापैकी ३ कोटी ६९ लाख रुपये आधीच अदा करण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित रकमेचा हिशोब मांडताना पालिकेने सल्लागाराला तब्बल ६० लाख ८६ हजार ८९३ रुपये अतिरिक्त मंजूर केले आहेत. ही जास्तीची रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी दिली जात आहे. याचे कोणतेही स्पष्टीकरण प्रशासकीय प्रस्तावात देण्यात आलेले नाही, असा आक्षेप एमआयएमचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य झमीर कुरेशी यांनी घेतला. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असून पालिकेने या वाढीव रकमेचा हिशेब द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

इमारत आणि अंतर्गत रचना कमकुवत

भांडुप जलशोधन केंद्राची स्थापना वर्ष १९७८ मध्ये झाली होती. मात्र, गेली अनेक वर्षे सातत्याने रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे या केंद्राची इमारत आणि अंतर्गत रचना आता अत्यंत कमकुवत झाली असून तिचे आयुर्मान संपत आले आहे. भविष्यात मुंबईवर पाण्याचे मोठे संकट ओढवू नये आणि पाण्याची होणारी मोठी गळती रोखता यावी, यासाठी पालिकेने या केंद्राच्या अत्याधुनिक पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या डिझाइन, बांधकाम आणि संचालनासाठी ‘मेसर्स शंकरनारायण कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या मुख्य कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.

Bandra Demolition : वांद्र्यात तोडक कारवाईचा चौथा दिवस; 90% झोपड्या जमीनदोस्त, आज पोलीस हायअलर्टवर

काय कारवाई करणार?

या प्रस्तावातील दुसरा आक्षेपार्ह मुद्दा म्हणजे, भविष्यात प्रकल्पाची किंमत वाढल्यास सल्लागाराची भरपाई करण्यासाठी आधीच २० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करून ठेवण्यात आली आहे.यावर बोलताना कुरेशी यांनी सवाल उपस्थित केला की, जर भविष्यात प्रकल्पाचा खर्च वाढलाच नाही, तर हे २० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत परत जमा होणार का? तसेच, कंत्राटदाराने जाणीवपूर्वक दिरंगाई करून खर्च वाढवला.तर पालिका अधिकारी त्यावर काय कारवाई करणार? हा सर्व प्रकार संशयास्पद असून जनतेचा पैसा अत्यंत विचारपूर्वक वापरला गेला पाहिजे, या भूमिकेवर लोकप्रतिनिधी ठाम राहिले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Bhandup water purification project proposal stalled there is no explanation in the proposal mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Bhandup
  • Mumbai News
  • Mumbai Water

संबंधित बातम्या

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात
1

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा
2

मुंबईसाठी सरकारचा मेगा मास्टर प्लॅन! 13 हजार कोटींचा पूरनियंत्रण आराखडा, 825 अब्ज डॉलर जीडीपीचे लक्ष्य; फडणवीसांची मोठी घोषणा

Mumbai News: प्रदूषणमुक्तीची ‘मिठी’ फक्त कागदावरच! मुंबईकरांना सांडपाण्याचा त्रास, तर महानगरपालिकेच्या तिजोरीला २१ कोटींचा भुर्दंड
3

Mumbai News: प्रदूषणमुक्तीची ‘मिठी’ फक्त कागदावरच! मुंबईकरांना सांडपाण्याचा त्रास, तर महानगरपालिकेच्या तिजोरीला २१ कोटींचा भुर्दंड

माणूस आहे की हैवान? दादर स्टेशनवर भर दिवसा महिलेला अमानुष मारहाण; लोक फक्त तमाशा पाहत राहिले, VIDEO VIRAL
4

माणूस आहे की हैवान? दादर स्टेशनवर भर दिवसा महिलेला अमानुष मारहाण; लोक फक्त तमाशा पाहत राहिले, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.