Pune Metro: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पुण्यातील लाखो आयटी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची वाट पाहणं आता संपलं आहे. शहरातील सगळ्यात जास्त चर्चेत असलेला हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग अखेर सुरु होतीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन 3 नोव्हेंबरला सकाळी होणार आहे. आणि उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवार, 4 नोव्हेंबरपासून सकाळी 6 वाजल्यापासून सामान्य प्रवाशांसाठी ही मेट्रो सुरु होणार आहे. जिल्हा न्यायालयापासून ते हिंजवडी फेज 3 म्हणजेच मेगापोलिस सर्कलपर्यंत जायला आता फक्त 62 रुपये लागणार आहेत. Pune Metro:
PMRDA चे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. सकाळी ऑफिसच्या गर्दीच्या वेळेत म्हणजे सकाळी 7.30 ते 9.30 आणि संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत दर 6 मिनिटाला मेट्रो मिळणार आहे. बाकीच्या वेळेत गर्दी कमी असते, तेव्हा दर 12 मिनिटाला मेट्रो असेल.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार बालेवाडीला उपस्थित राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात या मार्गावरील 17 स्टेशन सुरु होणार आहेत. उरलेली 6 स्टेशन जानेवारी 2027 पर्यंत हळूहळू सुरु होतील, असं चौधरी यांनी सांगितलं.
हिंजवडी ते शिवाजीनगर ‘मेट्रो लाईन 3’ला मिळाला अखेर मुहूर्त? 3 नोव्हेंबरला मेट्रो धावणार
या नवीन मार्गाला पिंक लाईन किंवा पुणेरी मेट्रो म्हणून ओळखलं जाणार आहे. या मार्गासाठी एकूण 22 ट्रेन तयार आहेत. सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो निघेल आणि रात्री 11.40 वाजता जिल्हा न्यायालयातून हिंजवडीकडे जाणारी शेवटची मेट्रो असेल. Pune Metro:
हा प्रकल्प केंद्र सरकारच्या 2017 च्या मेट्रो धोरणात मंजूर झालेला पहिला प्रकल्प आहे. हा PPP म्हणजे पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर बनला आहे. त्यामुळे इतर मेट्रोच्या तुलनेत याचं तिकीट थोडं जास्त आहे, हे स्वतः आयुक्तांनी मान्य केलं आहे.
तिकीट काढणं आता एकदम सोपं केलं आहे. स्टेशनवरच्या खिडकीवर तर तिकीट मिळेलच, पण त्यासोबतच QR कोडने पण तिकीट काढता येईल. सगळ्यात भारी म्हणजे आता व्हॉट्सअँपवर पण मेट्रोचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे रांगेत उभं राहण्याची गरज नाही.
महामेट्रोच्या ॲपमध्ये पण या नवीन मार्गाची सुविधा जोडली जाणार आहे. पुढच्या काही दिवसात पुण्यातील तिन्ही मेट्रो मार्गांसाठी एकच तिकीट वापरण्याची सोय पण सुरु होणार आहे, जेणेकरून प्रवाशांना वेगवेगळं तिकीट काढावं लागणार नाही.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा पूर्ण प्रवास करायला फक्त 45 मिनिटे लागतील. सध्या हिंजवडीला जायला आयटी कर्मचाऱ्यांना दीड ते दोन तास लागतात, ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. या मेट्रोमुळे त्यांचा रोजचा एक तास तरी वाचणार आहे.
विशेष म्हणजे या मेट्रोचं भूमिपूजन पण पंतप्रधान मोदींच्याच हस्ते नोव्हेंबर 2018 मध्ये झालं होतं. 5 वर्षात काम पूर्ण होईल असं वाटत होतं. पण कोरोनामुळे काम थांबलं आणि नंतर मार्च 2025 पर्यंत डेडलाईन देण्यात आली. पण ती पण चुकली. जवळपास 6 ते 8 वेळा तारखा पुढे ढकलल्या गेल्या.
अखेर 9 वर्षांनंतर ही मेट्रो सुरु होतेय.साधारणपणे इतर मेट्रोचं उद्घाटन झाल्यावर 2-3 तासातच प्रवाशांसाठी सुरु होते. पण इथे वेगळा पायंडा पाडला आहे. 3 तारखेला उद्घाटन आणि 4 तारखेपासून सेवा सुरु.
Ans: मेट्रो ४ नोव्हेंबर २०२६ पासून सामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.
Ans: १८ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी कमाल तिकीट दर ६२ रुपये आहे.
Ans: पहिल्या टप्प्यात १७ स्टेशन सुरू होणार आहेत. उर्वरित ६ स्टेशन जानेवारी २०२७ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे.






