Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान

आत्तापर्यंत केवळ बैठका मेळाव्यांमधून जिल्हा परिषद उमेदवारीसाठी राळ उठत होती. मात्र आता आचारसंहिता लागल्याने अंतिम उमेदवार कोण याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 18, 2026 | 01:29 PM
कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान

कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान

Follow Us
Close
Follow Us:
  • कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच
  • उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान
  • उमेदवार कोण याकडे सर्वांचेच लक्ष
मेढा/ दत्तात्रय पवार : आत्तापर्यंत केवळ बैठका मेळाव्यांमधून जिल्हा परिषद उमेदवारीसाठी राळ उठत होती. मात्र आता आचारसंहिता लागल्याने अंतिम उमेदवार कोण याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अशा परिस्थितीत कुडाळ गटातील ओबीसी महिला आरक्षणावर उमेदवारीसाठी रस्सीखेच वाढलेली पाहायला मिळत आहे. एकाच कुटुंबास संधी दिली जाऊ नये, यासाठी गटातील संपूर्ण ओबीसी समाज एकवटलेला असून, योग्य उमेदवारास संधी न दिल्यास भाजपचे पाढे पंचावन्न होतील. अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींवर योग्य उमेदवार निवडण्याची परिस्थिती ओढवली आहे.

जिल्हा परिषदेसाठी आनेवाडी गावातून योगिता फरांदे, श्वेता फरांदे, माधुरी गोरे या तीन महिलांनी भाजपकडे उमेदवारांची मागणी केली आहे. तर कुडाळमधून मोनिका बारटक्के, गीता लोखंडे यांच्यासह सर्जापूरच्या स्वागता बोराटे अशा मातब्बर महिला उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच वाढली आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत जयश्री गिरी यांना आरक्षण नसताना सायगाव गणातून उमेदवारी देण्यात आली होती. आता किमान ओबीसी नव्या चेहऱ्यास नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असा सूर इच्छुक ओबीसी महिला उमेदवारांमधून उमटत आहे. योग्य उमेदवार न दिल्यास पुन्हा एकदा कुडाळ गटाचा जिल्हा परिषदेचा उमेदवार पराभूत होऊ शकतो, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना योग्य उमेदवाराची निवड करावी लागणार आहे.

दीपक पवार अजूनही शांतच दिसत आहेत. मात्र शिवसेना शिंदे गटाने आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. गटातील कुडाळ गणात प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी सभापती खुर्चीवर डोळा ठेवत पुन्हा एकदा उमेदवारीसाठी ते रणांगणात उतरले आहेत. कुडाळ गावचे मतदान अधिक असल्याने त्यांना विजयाचा मार्ग सुकर वाटत आहे. मात्र कुडाळ गावातूनच त्यांच्याविरोधात एक छुपा दबाव गट तयार झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातून बाजार समितीचे चेअरमन राजेंद्र शिंदे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना शिंदे गटातून प्रशांत तरडे उमेदवार असतील.

सायगाव गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने भाजपा या ठिकाणी मोरखिंडीपलीकडील अकरा गावांमधील उमेदवार देऊ शकते. यामध्ये वर्षा जवळ, रिटकवलीच्या शारदा मर्ढेकर यांची नावे आघाडीवर आहेत.

गटाचा उमेदवार सायगाव गणातून

सायगाव गणातील आनेवाडीतून जिल्हा परिषदेचा उमेदवार दिला गेला व कुडाळ पंचायत समिती गणाचा उमेदवार कुडाळ तर सायगाव पंचायत समिती गणाचा उमेदवार हा अकरा गावांमधून दिला गेल्यास उमेदवारीचा त्रिकोण साधला जाऊन विजयाची गणिते भाजपच्या दृष्टीने सोप्पी होऊ शकतात. अशी सध्याची राजकीय परिस्थिती कुडाळ गटातील आहे.

हे सुद्धा वाचा : जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’

जयदीप शिंदेंची ऐनवेळी एन्ट्री

कुडाळ गटात गिरींच्या उमेदवारीसाठी विरोध वाढतच चालला असून, या विरोधात आता बाजार समितीचे चेअरमन व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जयदीप शिंदे यांनी देखील आपल्या पत्नीची कुणबी प्रमाणपत्राच्या जोरावर जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार एन्ट्री केली आहे.

गिरींची शिफारस करणार कोण ?

दोन टर्म सभापतीपद मिळवणाऱ्या गिरी दांपत्यास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सभापतीपद देऊन त्यांचा सन्मान राखला. मात्र लोकसभा निवडणूक व जिल्हा बँक निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना गिरींनी विरोधात काम केले. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीस निष्ठवंतांकडून विरोध वाढला आहे.

Web Title: Bjp faces a big challenge in selecting candidates for the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’
1

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’

Latur ZP Elections 2026: लातूर महानगरपालिका विजयानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज!
2

Latur ZP Elections 2026: लातूर महानगरपालिका विजयानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज!

ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…
3

ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…

Ratnagiri ZP Election: रत्नागिरीचे जागा वाटप सुटणार? सामंत जिल्ह्यात ठाण मांडून, शिवसेना 45…
4

Ratnagiri ZP Election: रत्नागिरीचे जागा वाटप सुटणार? सामंत जिल्ह्यात ठाण मांडून, शिवसेना 45…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.