Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ ही जगातील मोठी फसवणूक”; ‘त्या’ सात घटनांचा उल्लेख करत बावनकुळेंचे टीकास्त्र

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या शपथनामा वरुन भाजप आक्रमक झाले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोस्ट शेअर करत टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 25, 2024 | 05:25 PM
“शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ ही जगातील मोठी फसवणूक”; ‘त्या’ सात घटनांचा उल्लेख करत बावनकुळेंचे टीकास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूकीच्या पूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना शरद पवार गटाकडून त्याला ‘शपथनामा’ म्हणण्यात आले आहे. यावरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपने देखील या शपथनामा शब्दांवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शरद पवारांशी संबंधीत सात घटनांचा उल्लेख केला आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. २६ एप्रिल १६४५ रोजी छत्रपती… — Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 25, 2024

“शपथनामा” ही जगातील मोठी फसवणूक

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की,  “शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने “शपथनामा” नावाने लोकसभा निववडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील ही सगळ्यात मोठी फसवणूक म्हटली पाहिजे. खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? महाराष्ट्रात शपथेला प्राणापेक्षा अधिक महत्व आहे. 26 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ती पूर्ण केली. आणि शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात? शपथेला नाही, खंजीराला महत्व आहे.”  अशा शब्दांत बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

त्या सात घटना कोणत्या? 

पुढे बावनकुळे यांनी शरद पवार यांच्याशी संबंधित सात घटनांचा उल्लेख केला आहे. 1977 मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधी यांची साथ सोडून शरद पवार ब्रह्मानंद रेड्डी यांच्या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादांचे सरकार पाडले. 1980 मध्ये 40 आमदारांसह बंडखोरी करत पुलोद सरकार स्थापन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1988 मध्ये शरद पवार पुलोदमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 1999 मध्ये काँग्रेसमधून पुन्हा बाहेर राष्ट्रवादीची स्थापना केली. 2019 मध्ये अजितदादांना शब्द दिला.. आणि फिरवला! 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. खरंच सांगा, शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का?” असा सवाल उपस्थित करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Web Title: Bjp leader chandrashekhar bawankule criticise on sharad pawar manifesto nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2024 | 05:25 PM

Topics:  

  • BJP Vs NCP
  • chandrashekhar bawankule
  • loksabha elections 2024
  • political news
  • sharad pawar news

संबंधित बातम्या

शासकीय त्रासदायक कामं सोपी केली..; शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री बावनकुळेंचे केले कौतुक
1

शासकीय त्रासदायक कामं सोपी केली..; शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री बावनकुळेंचे केले कौतुक

Baramati By Election : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव
2

Baramati By Election : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव

Nanded Politics : राजकारणात आली नवी रंगत! विधान परिषदेच्या रिंगणात ‘मोठ्या चेहऱ्यांची’ प्रतिष्ठा पणाला
3

Nanded Politics : राजकारणात आली नवी रंगत! विधान परिषदेच्या रिंगणात ‘मोठ्या चेहऱ्यांची’ प्रतिष्ठा पणाला

Satara News : निलंबनाची मागणी अन् ‘काळे फासू’ इशारा: प्रभाग क्रमांक २३ च्या नागरिकांचा इशारा
4

Satara News : निलंबनाची मागणी अन् ‘काळे फासू’ इशारा: प्रभाग क्रमांक २३ च्या नागरिकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.