Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला मिळणार चालना; सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचा दावा केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 26, 2024 | 02:12 PM
Sudhir Mungantiwar

Sudhir Mungantiwar

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूकांमुळे राजकारण रंगले आहे. विविध मुद्द्यांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे. त्यामध्ये राज्याच्या अर्थसंकल्प महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी योजना देखील जाहीर करण्यात आली. ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मात्र त्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “लाडकी बहिण योजनेवरुन अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याची गरज नाही, कुठलीही फाईल वित्त विभागाकडून जाते,17 -18 लाख कर्मचाऱ्यांना वेतनाचा भार येत नाही. दोन-अडीच कोटी महिलांना लाभ देताना अडचण कशी येते. गरीब महिला बाजारपेठेत खरेदी करतात तेव्हा बाजाराला फायदा होणार आहे, या महिला काही अॅमेझॉनमधून खरेदी करत नाहीत. लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. गरीब महिलांवर अन्याय करण्याची ज्यांच्या मनात इच्छा आहे तेच लोक असं बोलू शकतात. सोळा-सतरा लाख लोकांसाठी 44 हजार कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला मात्र आता अर्थशास्त्र आणि तिजोरी आठवते आहे,” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

महायुतीमध्ये जागावाटपासाठी भांडण नाहीत

पुढे त्यांनी राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. मुनगंटीवार म्हणाले,  “भाजप 5 वर्षे जनतेचे संकल्प घेऊन काम करणारा पक्ष आहे. महाराष्ट्राची शक्ती वाढावी, स्थिरता राहावी ही भाजपची भूमिका राहिली आहे. मात्र लोकांना भ्रमित करण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे, आम्ही एकत्र काम करावे ही या मागची भूमिका आहे. विधानसभेसाठी जागा जेव्हा फायनल होतील तेव्हा सगळ्यांना माहीत पडेल. महायुतीमध्ये जागावाटप विस्तारासाठी भांडायचे नाही असे ठरवले आहे ,सूत्र लावल्यावर काही होणार नाही. पूर्व विदर्भात पक्षाच्या नेत्यांशी,आमदार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत,” असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

Web Title: Bjp leader sudhir mungantiwar claims that economy will be boosted by ladaki bahin yojana nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 02:12 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra poliotics
  • Sudhir Mungantiwar

संबंधित बातम्या

भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
1

भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा
2

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…
3

‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर
4

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.