Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळ बांगलादेशचे GenZ सत्ता बदलू शकतात तर भारतातसुद्धा… अरविंद केजरीवालांचे खळबळजनक विधान

"नेपाळ बांगलादेशचे GenZ सत्ता बदलू शकतात तर भारतातसुद्धा GenZ पेपर लीक करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवू शकत नाहीत का?" असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 14, 2026 | 07:35 PM
पंजाबमध्ये हिंदू व्यापाऱ्यांवर ईडीच्या धाडी, 'AAP' प्रमुख अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा

पंजाबमध्ये हिंदू व्यापाऱ्यांवर ईडीच्या धाडी, 'AAP' प्रमुख अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा

Follow Us
Follow Us:
  • अरविंद केजरीवाल यांची NEET पेपरफुटी प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका
  • २०१४ पासून आतापर्यंत ९३ पेपर लीक, ६ कोटींपेक्षा जास्त युवकांचे भविष्य उद्ध्वस्त- अरविंद केजरीवाल
  • जेव्हा पेपर लीक होतो, तेव्हा भाजप कनेक्शन समोर का येतात? – अरविंद केजरीवाल
NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात खळबळ उडाली असून लाखो विद्यार्थ्याचे भविष्य टांगणीला लागले आहे. केंद्र सरकारकडून परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. केंद्र सरकारकडूनदेखील याविषयी अतिशय गंभीर पावले उचलली जात असून आता थेट CBI कडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. अश्यातच आता आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, “नेपाळ बांगलादेशचे GenZ सत्ता बदलू शकतात तर भारतातसुद्धा GenZ पेपर लीक करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवू शकत नाहीत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी NEET पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर चांगलीच आगपाखड केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “२०१४ पासून आतापर्यंत ९३ पेपर लीक झाले आहेत. यामुळे ६ कोटींपेक्षा जास्त युवकांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. अश्यातच सर्वाधिक पेपर लीक त्या राज्यांमध्ये झाले, जिथे भाजपची डबल इंजिन सरकार आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात मध्ये सर्वाधिक पेपर लीक झाले आहे. हा फक्त योगायोग आहे का?” असा सवाल त्यांनीं उपस्थित केला.

NEET UG 2026 : थलपथी विजय यांची ‘नीट’ रद्द करण्याची मागणी; मग आता परीक्षा होणार की नाही ?

“पेपर लीक प्रकरणात भाजप कनेक्शन?” – अरविंद केजरीवाल

नेपाळ आणि बांग्लादेशमधील Gen-Z आंदोलनाच्या पार्शवभूमीवर ते पुढे म्हणाले, “जर नेपाळ आणि बांग्लादेशमधील Gen-Z आपली सरकार बदलू शकतात, तर भारतातील Gen-Z पेपर लीक करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवू शकत नाहीत का? भाजप सरकारच्या संरक्षणाखाली भाजप नेत्यानेच NEET चा पेपर लीक केला. NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणात भाजप नेते दिनेश बिंवाल यांच्या अटकेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की देशाची शिक्षण व्यवस्था माफिया आणि सत्तेच्या संगनमताची बळी ठरत आहे. ३० लाख रुपयांत पेपर खरेदी करण्यात आला आणि नंतर तो अनेक लोकांना विकला गेला. प्रश्न सरळ आहे जेव्हा-जेव्हा पेपर लीक होतो, तेव्हा भाजप नेते, भाजप कनेक्शन आणि भाजप नेत्यांकडून आरोपींना संरक्षण दिल्याच्या गोष्टीच समोर का येतात? डबल इंजिन भाजप सरकारमध्ये प्रत्येक मोठ्या पेपर लीकचा धागा भाजप नेत्यांपर्यंतच का पोहोचतो?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात खळबळ उडाली असून लाखो विद्यार्थ्याचे भविष्य टांगणीला लागले आहे. केंद्र सरकारकडून परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. केंद्र सरकारकडूनदेखील याविषयी अतिशय गंभीर पावले उचलली जात असून आता थेट CBI कडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

NEET पेपरफुटीवरून Raj Thackeray भडकले,”सरकारची लोकांना वेठीस धरण्याची परंपरा, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!”

Web Title: Arvind kejriwal slams bjp over neet paper leak case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • arvind kejariwal
  • BJP
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल
1

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
2

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Sangli Politics: संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द, मुंबईकडे रवाना झालेले कार्यकर्ते परतले; नेमकं कारण काय?
3

Sangli Politics: संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द, मुंबईकडे रवाना झालेले कार्यकर्ते परतले; नेमकं कारण काय?

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
4

‘गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंतप्रधानपदाचे पंख…’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, तर आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.