मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार आमचे नेते आहेत, असे विधान केले होते. त्यामुळे आज सकाळपासूनच राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर शरद पवारांनी, असे म्हटलो नसल्याचे सांगून कुटुंब म्हणून अजित पवार आमचे आहेत, असे सांगितले.
शरद पवारांच्या विधानामुळे उलटसुलट चर्चा
शरद पवारांच्या विधानामुळे सकाळपासूनच उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. यावर अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपच्या एका नेत्याने शरद पवारांबद्दल बोलताना म्हटलं की, पवारांचं वक्तव्य खरं असेल तर निश्चितपणे आम्ही त्यांचं स्वागत करु. अजित पवारांची भूमिका खरी असून राष्ट्रवादीचं आम्हाला समर्थन आहे, हे सिद्ध होईल.
प्रवीण दरेकर यांनी याबाबत भाष्य केले
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी याबाबत भाष्य केलं आहे. दरेकर म्हणाले की, शरद पवार यांच वक्तव्य खरं असेल तर निश्चित आम्ही त्याच स्वागत करू. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, राष्ट्रवादी पक्षाचं समर्थन आम्हाला आहे खरं ठरेलं. वातावरण तयार करण्याचं काम पवार यांची भूमिका करत असते.
दरेकर पुढे म्हणाले की, एका बाजूला आमचे फोटो लावायचे नाही, अशा सूचना जातात यांचा अर्थ काय? पक्ष एक आहे अजित पवार आपले नेते आहेत, शरद पवार यांना दैवत मानत असतील तर फोटोच्या आक्षेपाच कारण नाही. आमच्यासाठी स्वागतार्ह भूमिका असली तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विचार करायची आवश्यकता आहे.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
कार्यकर्त्यांची अवस्था तुम्ही समजून घेत नाही. जनतेला काय वाटतं याचा विचार करत नाही. शेवटी जनतेच्या जीवावर आपण राजकारण करतो. स्वतःच्या राजकारणासाठी एका बाजूला परिवार एक आहे म्हणायचं अन् दुसऱ्या बाजूला विरोधक म्हणून सभा घ्यायच्या, अशा प्रकारचं राजकारण पवार यांनी सातत्याने केलं आहे
मोदींना अजित पवार यांनी समर्थन दिलं आहे. पवारांनी घेतलेल्या भूमिकेला काही काळ द्यावा लागतो त्यामुळे खरं काय खोटं काय हे येणार काळ स्पष्ट करेल.
Web Title: Bjp leaders big statement they say so we are ready to welcome sharad pawar nryb