Narayan Rane : 'ते कोकणात येतील त्या दिवशी कोंबडी वडे, मासे बंद'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
ठाकरे आणि राणे यांच्यात कायमच राजकीय कलगीतुरा पहायला मिळतो. तो आजही पहायला मिळाला. सिंधुदुर्गमध्ये आज खासदार नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या उपस्थितीत विकास आढावा बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या विकासावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ज्या दिवशी ते कोकणात येतील, त्या दिवशी कोंबडी वडे, मासे बंद, असं हॉटेल वाल्यांना सांगितल्याचं ते म्हणाले.
Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांची सरकारवर जोरदार टीका; म्हणाले, “ज्यांनी इतिहासाला काळीमा…”
”ते आता येणार आहेत ना, खालून वरपर्यंत काम करण्यासाठी. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात सिंधुदुर्गला किती पैसे दिले त्याची आकडेवारी मागवा. नाहीतर मी तुम्हाला आकडेवारी देतो. मग कळेल काय अधिकार आहे कोकणावर बोलायचा आणि कोकणात येण्याचा. त्यामुळे ते ज्या दिवशी येतील त्या दिवशी कोंबडी वडे, मासे बंद ठेवा असं मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगून टाकलं आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठक आज पार पडली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
नारायण राणे पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजची बैठक खेळीमेळीत पार पडली. जिल्ह्यात विविध योजनांसाठी जो पैसा येतो तो १०० टक्के खर्च व्हावा यादृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. सर्व विकासकामे वेळेत मार्गी लागावीत आणि पूर्ण व्हावीत यासाठी आमचा प्रयत्न असेल. पालकंमत्री मी आणि अधिकाऱ्यांनी याचा आढावा घेतला आहे. त्यामुळे ती पूर्ण होतील, असं खात्रीशीर आश्वासन त्यांनी दिलं.
दणका द्यायचा अन् कापून टाकायचं…; वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत उदयनराजे भोसलेंची आक्रमक भूमिका
सिंधुदुर्गात ड्रग्ज विषयी वारंवार समोर येत आहे, असा प्रश्न पत्रकारांना विचारला होता, त्यावर बोलताना ते नारायण राणे म्हणाले, या बैठकीत पहिल्यांदाच हा विषय मांडण्यात आला. या जिल्ह्यात पुन्हा ड्रग्ज सापडणार नाही, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसंच प्रस्तावित घोटगे-सोनवडे कोल्हापूर घाटरस्त्यासाठी जे पैसे लागतील ते देणार. आम्ही आहोत त्यामुळे पैसे मिळणार, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आता इंडिगो पण येणार, विमानतळ आता कधी बंद नाही. सर्व विमाने येणार. पण लोकांनी प्रवास करावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.