Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपचा ‘शिंदे पॅटर्न’ सोलापुरात? विधानपरिषदेसाठी महिला चेहऱ्याला संधीची जोरदार चर्चा; अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीवर सस्पेन्स कायम

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर न केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या जागेसाठी भाजपकडून महिला उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • By विवेक
Updated On: May 28, 2026 | 06:40 PM
BJP will give ticket to women for Vidhan Parishad candidature in Solapur

BJP will give ticket to women for Vidhan Parishad candidature in Solapur

Follow Us
Follow Us:

सोलापूर शहर प्रतिनिधी: सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर न केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या जागेसाठी भाजपकडून महिला उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, पक्षाच्या ‘धक्का तंत्रा’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचक वक्तव्यांनी राजकीय चर्चांना आणखी रंग चढला आहे. भाजपकडून अंतिम क्षणापर्यंत उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवण्यात येत असून, यामागे पक्षांतर्गत गटबाजी टाळण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

राज्यसभा निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रा. ज्योती वाघमारे यांना अचानक उमेदवारी देत सर्वांनाच धक्का दिला होता. त्याच धर्तीवर आता सोलापूर विधान परिषदेसाठीही पुरुष इच्छुकांऐवजी महिला उमेदवाराला संधी देण्याचा गंभीर विचार भाजपश्रेष्ठींकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या राजकीय वर्तुळात डॉ. श्रद्धा जवंजाल, रश्मी बागल आणि राजश्री नागणे या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. महिला आरक्षण, महिला नेतृत्व आणि नव्या चेहऱ्याला संधी असा संदेश देण्यासाठी भाजपकडून महिला उमेदवाराचा प्रयोग होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

दरम्यान, राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांबाबत महायुतीत काही ठिकाणी अद्याप तिढा कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली बैठकीनंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे मतदारसंघांबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जागावाटपावर जवळपास सहमती झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर सोलापुरातही भाजप ‘शिंदे पॅटर्न’ राबविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना अंतिम क्षणापर्यंत उमेदवाराचा चेहरा गुप्त ठेवण्याची रणनीती भाजप अवलंबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता भाजपचा अंतिम ‘सरप्राइज चेहरा’ कोण असणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Shivsena News : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेनेची मोठी तयारी; राज्यात सव्वा लाखांहून अधिक BLA नियुक्त

सोमवारीच उघडणार पत्ते?

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पारडे सध्या जड मानले जात असले तरी पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी उमेदवाराचा निर्णय गोपनीय ठेवण्यात आला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच भाजपचा अंतिम उमेदवार जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Gopichand Padalkar: हर्षवर्धन सपकाळ यांचे डोके सडलेल्या कांद्यासारखे आहे; भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची विरोधकांवर तोफ

Web Title: Bjp will give ticket to women for vidhan parishad candidature in solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • BJP
  • Solapur
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल
1

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
2

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

मी सरकारचा भाग नाही, मी आमदार अन्…; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ
3

मी सरकारचा भाग नाही, मी आमदार अन्…; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ

BJP Leader Murder : भाजप नेत्याची चाकूने हत्या, धारदार शस्त्राने वार करुन जागेवरच संपवलं; कारण…
4

BJP Leader Murder : भाजप नेत्याची चाकूने हत्या, धारदार शस्त्राने वार करुन जागेवरच संपवलं; कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.