Marathi Patrakar Din : जाणून घ्या 'दर्पण' पासून सुरु झालेल्या मराठी पत्रकारितेचा प्रवास अन् याची सुरुवात करणाऱ्या महापुरुषाबद्दल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आज मराठी पत्रकार दिन आहे. महाराष्ट्रात दरवर्षी ६ जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो. आज मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जाभेंकर यांचा स्मृतिदिन. यानिमित्त त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी १८३२ मध्ये त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरु करत मराठी पत्रकारितेचा पाया रचला होता, ज्यामुळे इतिहासात मराठी पत्रकारितेचे नवे पर्व सुरु झाले.
वेळचे आणि वयाचे गणित अगदी चालते बरोबर; राजकीय नेते जुने झाल्यास अनुभव येतो खरोखर
मराठी पत्रकारितेचा मुहूर्तवेढ रोवणारे महापुरुष आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ६ जानेवारी १८१२ मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्यांनी आपले शिक्षण गावात पुर्ण केले आणि नंतर मुंबई येथे उच्च शिक्षणासाठी आहे. त्यांचे उच्च शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात पूर्ण झाले आहे. येथेच त्यांना त्यांची विद्वत्ता लक्षात आली. त्यांनी अगदी लहान वयातच प्राध्यापक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यांच्या विचारांनी, कार्यानी समाजात प्रबोधन घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आज आपण त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
स्तन कापले, मेंटली टॉर्चर केलं अन्…. भारताची पहिली महिला गुप्तहेरचा अंगावर काटा आणणारा मृत्यू






