
Mahanagar Palika Result 2026 Live,
16 Jan 2026 11:06 AM (IST)
दुसऱ्या माळ्यावर बैठक व्यवस्था मात्र मतमोजणी दिसू नये म्हणून लावला पडदा
16 Jan 2026 11:05 AM (IST)
कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे 4 उमेदवारी विजयी
16 Jan 2026 11:02 AM (IST)
PMC Municipal Election 2026 Live: ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होताच भारतीय जनता पक्षाने (BJP) पुणे शहरात आपले वर्चस्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या कलानुसार:
भाजप: ०९ जागांवर आघाडीवर.
राष्ट्रवादी (अजित पवार गट): ०३ जागांवर आघाडीवर.
कोथरुड, पर्वती आणि शिवाजीनगर भागात भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
16 Jan 2026 10:59 AM (IST)
जळगाव भाजपने खातं उघडलं
16 Jan 2026 10:53 AM (IST)
नागपूरमध्ये भाजप 50 जागांवर आघाडीवर
16 Jan 2026 10:52 AM (IST)
कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी
16 Jan 2026 10:50 AM (IST)
PMC Municipal Election 2026 LIVE: पुणे महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठी आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टपाली मतदानानंतर आता ईव्हीएममधील (EVM) मतांची मोजणी सुरू झाली असून, पुण्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर येत आहेत. विशेषतः हडपसर परिसरातील निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
प्रशांत जगताप विरुद्ध अभिजित शिवरकर: चुरशीची लढत
पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना सुरुवातीच्या फेरीत मोठा धक्का बसला आहे. हडपसरमधील त्यांच्या प्रभागातून ते सध्या पिछाडीवर आहेत.
अभिजित शिवरकर (काँग्रेस/महाविकास आघाडी): १००९ मते (आघाडीवर)
प्रशांत जगताप (राष्ट्रवादी SP): ८७३ मते (पिछाडीवर)
16 Jan 2026 10:47 AM (IST)
16 Jan 2026 10:47 AM (IST)
मुंबईत समाधान सरवणकर पिछाडीवर, निशिकांत शिंदे आघाडीवर
मुंबईत प्रभाग क्रमांक 194 मध्ये शिवसेना ठाकरे गटाची आघाडी
16 Jan 2026 10:44 AM (IST)
बीएमसीच्या सुरुवातीच्या ट्रेंड्समध्ये भाजप युती आणि शिवसेना-यूबीटी युतीमध्ये जवळची स्पर्धा दिसून येते. आतापर्यंत, भाजप युती २७ वॉर्डमध्ये आघाडीवर आहे, तर शिवसेना-यूबीटी युती १७ वॉर्डमध्ये पुढे आहे. काँग्रेस फक्त दोन वॉर्डमध्ये पुढे आहे.
16 Jan 2026 10:43 AM (IST)
सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर पिछाडीवर आहेत. ते वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवत आहेत. उद्धव ठाकरे पक्षाच्या निशिकांत शिंदे यांच्या विरुद्ध समाधान सरवणकर यांचा थेट सामना आहे. समाधान सरवणकर 133 मतांनी पिछाडीवर आहेत. सदा सरवणकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत.
16 Jan 2026 10:43 AM (IST)
PCMC Municipal Election 2026 LIVE: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ जागांसाठी आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शहरात एकूण ३२ प्रभागांतून निकाल जाहीर केले जात असून, सुरुवातीच्या कलानुसार भारतीय जनता पक्षाने (BJP) आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनीही अनेक जागांवर चुरस निर्माण केली आहे.
राजकीय पक्ष विजयी / आघाडीवर असलेल्या जागा
भारतीय जनता पार्टी (BJP) ०५
राष्ट्रवादी (अजित पवार गट) ०३
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ०१
राष्ट्रवादी (शरद पवार गट) ०१
शिवसेना (UBT) --
काँग्रेस --
मनसे (MNS) --
इतर व अपक्ष --
16 Jan 2026 10:40 AM (IST)
कोल्हापूमध्ये भाजप 15, शिवसेना शिंदे गट 7, राष्ट्रवादी काँग्रेस 3, काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर
जळगावमध्ये भाजप 10, शिवसेना शिंदे गट 5 जागी आघाडीवर
16 Jan 2026 10:37 AM (IST)
Ichalkaranji Municipal Election Result : महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या तासाभरातील कलानुसार, भारतीय जनता पक्षाने शहरात वर्चस्व राखले असून ८ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. या निवडणुकीत भाजप आणि स्थानिक 'शिव-शाहू विकास आघाडी' यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या ११ फेऱ्यांच्या नियोजनापैकी पहिल्या काही फेऱ्यांचे कल खालीलप्रमाणे आहेत:
भाजप (BJP): ८ जागांवर आघाडी.
शिव-शाहू विकास आघाडी: ३ जागांवर आघाडी.
इतर/अपक्ष: १ जागेवर आघाडी.
16 Jan 2026 10:37 AM (IST)
पनवेलमध्ये भाजपने आपली विजयाची परंपरा कायम राखल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच भाजप उमेदवाराने मोठी आघाडी घेतली आहे. सिडको क्षेत्रातील नागरी प्रश्नांचा प्रभाव या निकालांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.
16 Jan 2026 10:36 AM (IST)
Kolhapur Municipal Election Result 2026 Live LIVE: कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टपाली मतदानामध्ये आणि पहिल्या फेरीच्या कलानुसार काँग्रेसने काही जागांवर आघाडी घेतली असून, महायुतीनेही (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) चुरस निर्माण केली आहे.
16 Jan 2026 10:34 AM (IST)
नाशिकमध्ये पिता सुधाकर बडगुजर आघाडीवर, तर पुत्र दीपक बडगुजर पिछाडीवर आहेत.
16 Jan 2026 10:33 AM (IST)
PCMC Election Result 2026 LIVE: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला आज सुरुवात झाली असून, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन हायअलर्टवर आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण शहर परिसरात जमावबंदीचे आदेश (कलम १४४) लागू करण्यात आले आहेत. पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
16 Jan 2026 10:33 AM (IST)
कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे राहुल माने सुरुवातीच्या कलात आघाडीवर आहे. तर माजी स्थायी समिती सभापती शिवसेनेचे उमेदवार शारंगधर देशमुख पिछाडीवर. भाजपचे विजय देसाई, माधवी पाटील आणि शिवसेनेचे संगीता सावंत आघाडीवर आहेत.
16 Jan 2026 10:32 AM (IST)
पुण्यात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पिछाडीवर असून भाजपच्या स्वरदा बापट आणि कुणाल टिळक आघाडीवर
16 Jan 2026 10:28 AM (IST)
मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून शहरात 9 ठिकाणी मतमोजणी केंद्र उभारण्यात आले आहेत. 155 टेबलवर मतमोजणी होणार आहे. 600 कर्मचारी आणि 3000 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.
16 Jan 2026 10:22 AM (IST)
मुंबईत कुर्ला नेहरूनगर, सायनमध्ये अजूनही मतमोजणी सुरु नाही
16 Jan 2026 10:21 AM (IST)
उल्हासनगरमध्ये भाजप 5 जागांवर आघाडीवर आहे.
16 Jan 2026 10:19 AM (IST)
पिंपरी चिंचवड महानगरापालिकेमध्ये मतमोजणी सुरू
पुणे महानगरपालिकेमध्ये मतमोजणीला सुरूवात
पुण्यात टपाली मतमोजणीला सुरुवात
16 Jan 2026 10:19 AM (IST)
मीरा भाईंदर आणि वसई विरारमध्ये अजूनही मतमोजणीला सुरुवात नाही
16 Jan 2026 10:13 AM (IST)
सोलापूरमध्ये भाजपचे 5 उमेदवार आघाडीवर आहेत.
16 Jan 2026 10:12 AM (IST)
ठाण्यात भाजप 6 तर शिवेसना 9 जागांवर आघाडीवर
16 Jan 2026 10:10 AM (IST)
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कामोठे परिसरातील प्रभाग क्रमांक ११, १२ आणि १३ मधील मतमोजणीसाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी केंद्रांवर आवश्यक कर्मचारी, निवडणूक साहित्य तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मतमोजणी प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर प्राथमिक कल समोर येण्याची शक्यता असून टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान, उमेदवार, कार्यकर्ते तसेच नागरिक निकालाबाबत उत्सुक आहेत. या निकालांचा पनवेल महानगरपालिकेच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे
16 Jan 2026 10:09 AM (IST)
मुंबईत महायुतीला 21 ठिकाणी आघाडीवर आहे.
16 Jan 2026 10:09 AM (IST)
नागपूर भाजपचे 3 उमेदवार आघाडीवर
16 Jan 2026 10:08 AM (IST)
Municipal Election Result 2026 Live: टपाल मतमोजणीत ठाण्यात ३ जागांवर तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजप दोन ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नागपुरमध्ये भाजप ११ जागांवर आघाडीवर आहेत. मुंबईत भाजप २१ ठिकाणी आघाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलांनुसार समोर आले आहे.
16 Jan 2026 10:07 AM (IST)
मुंबई महापालिकेच्या मतमोजणीला अखेर सुरूवात झाली असून सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे.
16 Jan 2026 10:07 AM (IST)
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला अखेर सुरूवात झाली आहे. पुण्यात भाजप दोन ठिकाणी आघाडी
16 Jan 2026 10:06 AM (IST)
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला अखेर सुरूवात झाली आहे. ठाण्यात भाजप तीन ठिकणी आघाडी
16 Jan 2026 10:03 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उमेदवाराच्या प्रतिनिधीला आत प्रवेश देण्यावरून पोलिसांशी वाद झाला. या वादातून पोलिसांनी उमेदवाराच्या प्रतिनिधीवर लाठीचार्ज केला. या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
16 Jan 2026 10:03 AM (IST)
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला अखेर सुरूवात झाली आहे. सुरूवातीला टपाल मतमोजणीला सुरूवात करण्यात आली आहे.
16 Jan 2026 09:55 AM (IST)
सोलापुरात स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली असून, मतमोजणी केंद्र क्रमांक ६ मधील स्ट्राँग रूम उघडली आहे. सोलापूर शहरातील २६ प्रभागांतील १०२ जागांसाठी ७ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, त्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडण्यात आल्या आहेत.
सोलापुरात ५३.०२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाल्यानंतर काल या EVM स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. आज मतमोजणीसाठी या स्ट्रॉंग रूम उघडण्यात आल्या असून, काही वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
16 Jan 2026 09:49 AM (IST)
अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 ची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होत असून, दुपारी 3 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल 661 उमेदवार रिंगणात असल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मागील निवडणुकीत भाजपने 45 जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली होती. मात्र यावेळी राजकीय समीकरणे बदललेली दिसत असून, सत्तेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत राणा दाम्पत्य आणि खोडके दाम्पत्य यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, काही प्रभागांतील निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप आणि काँग्रेस यांच्यात तिहेरी लढत होण्याची चिन्ह आहेत. मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
16 Jan 2026 09:48 AM (IST)
भिवंडी निजामपूर शहर महापालिका यंत्रणा मतदान नंतर मतमोजनी करिता सज्ज झाली आहे.काल सकाळी 7:30 ते 5:30 पर्यत 53.43% ईतकं मतदान झाले असून सकाळी 10 वाजल्यापासून 23 प्रभागातील 90 उमेदवार यांचा निकाल समोर येणार आहे.शहरातील एकूण 750 मतदान केंद्राचा निकाल वेगवेगळ्या 5 प्रभागत मतमोजणी केंद्रावर होणार आहे असून 5 मतमोजणी केंद्रावर 7 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .मतदार राजाने आपलं बहुमत कुठल्या पक्षाला दिलं आणि कुठल्या पक्षाचा गुलाल उधळेल,महापालिकेवर सत्ता कोणाची, नगरसेवक कोण, महापौर कोण याची हेच पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
16 Jan 2026 09:35 AM (IST)
Jalgaon Municipal Election Result 2026 LIVE: जळगाव महानगरपालिकेच्या ६३ जागांसाठी आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात ही प्रक्रिया पार पडत असून, प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत ७५ पैकी १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित जागांसाठी आज फैसला होणार आहे.
जळगाव महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी राज्यातील बड्या नेत्यांनी कंबर कसली होती. या निकालामुळे खान्देशातील राजकीय वर्चस्व कोणाचे, हे स्पष्ट होणार आहे:
गिरीश महाजन (भाजप): भाजपचा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान.
गुलाबराव पाटील (शिवसेना - शिंदे गट): पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला.
एकनाथ खडसे (राष्ट्रवादी - शरद पवार गट): 'खडसे फॅक्टर' आजही चालतो का, याकडे लक्ष.
16 Jan 2026 09:31 AM (IST)
Solapur Election Result 2026 LIVE : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. २६ प्रभागांतील १०२ जागांसाठी झालेल्या या रणसंग्रामात ५६४ उमेदवारांचे भवितव्य आज स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली असून, प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे.
स्ट्राँग रूम उघडली, उमेदवारांची धाकधूक वाढली
आज सकाळी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत शहरातील ७ ठिकाणच्या मतमोजणी केंद्रांवरील स्ट्राँग रूम उघडण्यात आल्या. मतमोजणी केंद्र क्रमांक ६ मधील स्ट्राँग रूम उघडल्यानंतर ईव्हीएम मशीन बाहेर काढण्यात आल्या.
एकूण जागा: १०२
प्रभाग संख्या: २६
मतमोजणीची ठिकाणे: ७ केंद्रे
मतदानाची टक्केवारी: ५३.०२% (मागील निवडणुकीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी घट)
16 Jan 2026 09:25 AM (IST)
NMC Election Result 2026: : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि राज्याचे उपराजधानी असलेले नागपूर शहर सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा संसदीय मतदारसंघ आणि राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असल्याने, येथील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल राज्याच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणारे मानले जात आहेत.
१५ जानेवारी रोजी पार पडलेल्या मतदानामध्ये नागपूरकरांनी आपला कौल नोंदवला आहे. या निवडणुकीची महत्त्वाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
एकूण जागा: १५१
प्रभाग (वॉर्ड) संख्या: ३८
एकूण मतदार: २४.४७ लाखांहून अधिक
उमेदवारांची संख्या: ९९३
16 Jan 2026 09:04 AM (IST)
बीएमसी निवडणुकीसाठी गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. आज 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमजोणीची प्रक्रिया सुरु होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 23 मतमोजणी कक्षावर सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्याला महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजूरी दिली आहे.
16 Jan 2026 08:54 AM (IST)
अखेर हो नाही म्हणता म्हणता नवी मुंबई पालिकेची निवडणूक संपन्न झाली असून मुख्य लढत भाजपा व शिवसेनेच राहणार असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नवी मुबाईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नवी मुंबईत यंदा शिवसेना ही नाईकांच्या सत्तेच्या म्हणजेच भाजपाच्या तोडीस तोड पोहोचलेली दिसून आली. हा कदाचित शिवसेनेसाठी मानसिकदृष्ट्या विजय म्हणावा लागले असे तज्ञांचे म्हणणे आहे.
16 Jan 2026 08:44 AM (IST)
आज जाहीर होणाऱ्या निकालांकडे सर्वांचे लागले आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी एक्झिट पोलने असा अंदाज वर्तवला आहे की, एक्झिट पोलने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये तसेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपाला निर्विवाद वर्चस्व मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
16 Jan 2026 08:34 AM (IST)
प्रभाग क्रमांक 201 मध्ये शिवसेना (उबाठा) च्या उमेदवार आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार सुप्रिया मोरे यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. तर या प्रभागामध्ये काँग्रेसने पल्लवी मुणगेकर यांना उमेदवारी दिली होती.
16 Jan 2026 08:24 AM (IST)
नागपूर : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी (दि.15) मतदान पार पडले. मतदारांमध्ये कुठं उत्साह तर कुठं निरूत्साह दिसून आला. नागपुरात महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये सकाळपासून निरुत्साह दिसत होता. तो दुपारपर्यंत कायम होता. मात्र, सायंकाळी अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. चंद्रपुरात दोन महिला उमेदवारांच्या पतीमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्या लाठीमार करावा लागला.
16 Jan 2026 08:13 AM (IST)
मुंबई : पुणे, नाशिक, नागपूर, मुंबईसह 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. राज्यातील अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. राज्यात सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर आज महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येतील. यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अनेक भागांतील निकाल हळूहळू समोर येतील.
16 Jan 2026 08:00 AM (IST)
Thane Election Result 2026 Live : ठाणे महानगरपालिकेच्या ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी काल (गुरुवार) उत्साहात मतदान पार पडले. निवडणूक आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ठाण्यात एकूण ५५.५९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मतदान प्रक्रियेत ४,८३,६९८ पुरुष, ४,३३,३८५ महिला आणि ४० इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने या मतदानाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ६४१ उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत सत्तेचे चित्र स्पष्ट होईल.
मतदानाची सविस्तर आकडेवारी:
एकूण मतदान: ५५.५९%
एकूण मतदार: १६,४९,८६९ (८.६३ लाख पुरुष, ७.८५ लाख महिला)
प्रत्यक्ष मतदान केलेले नागरिक: ९,१७,१२३
मतदान केंद्रांची संख्या: २,०१३
16 Jan 2026 07:50 AM (IST)
BMC Municipal Election Result 2026: महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता 'रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्स'चे एक्झिट पोल समोर आले आहेत. या अंदाजानुसार, राज्यात महायुती मोठी बाजी मारण्याची शक्यता असून २९ पैकी तब्बल २७ महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येण्याचे संकेत आहेत.
कसे आहेत एक्झिट पोलचे निष्कर्ष
महायुतीचे वर्चस्व: राज्यातील एकूण २९ महापालिकांपैकी बहुतांश ठिकाणी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती सत्ता काबीज करेल.
काँग्रेसला केवळ दोन ठिकाणी संधी: या एक्झिट पोलनुसार, केवळ लातूर आणि कोल्हापूर या दोनच महापालिकांमध्ये काँग्रेसला विजयाची किंवा सत्ता स्थापनेची संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईतही महायुतीची हवा: मुंबईसह पुणे, ठाणे आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरांतही महायुतीचेच पारडे जड असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
रुद्र रिसर्चचा अंदाज: रुद्र रिसर्चने राज्यातील सर्व २९ महापालिकांच्या मतदारांचा कल अभ्यासून ही आकडेवारी मांडली आहे. या अंदाजामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर विरोधकांसाठी हा कौल चिंतेचा विषय ठरू शकतो. प्रत्यक्ष निकाल आज (१६ जानेवारी) दुपारपर्यंत स्पष्ट होतील.
Municipal Election Result 2026 Live : मुंबई आणि पुण्यासह राज्यातील २९ महत्त्वाच्या महानगरपालिकांसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) विक्रमी उत्साहात मतदान पार पडल्यानंतर, आज संपूर्ण राज्याचे लक्ष निकालांकडे लागले आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत राज्यातील महापालिकांवर कोणाचा झेंडा फडकणार, याचे चित्र स्पष्ट होईल.
या निवडणुकांमध्ये राज्यात अनेक नवी समीकरणे पाहायला मिळाली. युत्या आणि आघाड्यांच्या खिचडीमुळे मतदारांनी कोणाला पसंती दिली आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या मोठ्या शहरांमधील निकालांचा परिणाम राज्याच्या आगामी राजकारणावर होण्याची शक्यता आहे.