Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय

Bombay HC Clerk Typing Test : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी 16 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली ऑनलाइन टंकलेखन परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सर्व्हर आणि कीबोर्डच्या समस्यांसह विविध तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना त्रास झाला होता.

  • By विवेक
Updated On: Aug 29, 2026 | 09:48 PM
Bombay High Court

Bombay High Court

Follow Us
Follow Us:

16 ऑगस्टची हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्ट रद्द
सर्व्हर आणि कीबोर्डच्या तांत्रिक समस्यांमुळे उमेदवार त्रस्त
नव्या परीक्षेची तारीख लवकरच संकेतस्थळावर जाहीर होणार

Bombay HC Clerk Typing Test : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी 16 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन टंकलेखन परीक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांवर आलेल्या विविध तांत्रिक अडचणी आणि उमेदवारांना आलेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नव्या टंकलेखन परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.

लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेत ऑनलाइन टंकलेखन चाचणी महत्त्वाची होती. मात्र, परीक्षा सुरू असताना अनेक केंद्रांवर उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेक उमेदवारांना अपेक्षित पद्धतीने परीक्षा देता आली नसल्याच्या तक्रारी समोर आल्या.

सर्व्हर डाऊन, कीबोर्डच्या समस्यांमुळे गोंधळ

16 ऑगस्ट रोजी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, कल्याण, वाशिम, हिंगोली यासह विविध ठिकाणी परीक्षा केंद्रांवर तांत्रिक समस्या आल्याचे उमेदवारांनी सांगितले. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे, तर काही केंद्रांवर कीबोर्ड व्यवस्थित काम न करणे यासारख्या अडचणी निर्माण झाल्याची तक्रार होती. त्यामुळे संतप्त झालेल्या उमेदवारांनी आंदोलनही केले होते.

Pune HCMTR Inner Ring Road: पुण्याच्या ‘HCMTR’ प्रकल्पाला ३० वर्षांनंतर मुहूर्त; भूसंपादनासाठी ३१ ऑगस्टची मुदत

परीक्षेतील या गोंधळानंतर उमेदवारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सीजेपीचे अभिजीत दीपके यांनीही छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसोबत ठिय्या आंदोलन केले होते.

रोहित पवारांचा पाठपुरावा

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पाठपुरावा केला होता. उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीच्या टंकलेखन परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाचे महानिबंधक मुनगंटे आणि महाधिवक्ता मिलिंद साठे यांची भेट घेतली होती.

उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टायपिंगच्या परीक्षेत काल मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. त्यामुळं ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला. त्यामुळं या परीक्षेतील गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि सदर भरती परीक्षा रद्द करुन… pic.twitter.com/4GCI10XfHt — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 17, 2026

परीक्षेतील समस्यांच्या पार्श्वभूमीवर 16 ऑगस्टची टंकलेखन चाचणी रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी केली होती.

नव्या परीक्षेची तारीख कधी?

अखेर न्यायालयीन प्रशासनाने 16 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली ऑनलाइन टंकलेखन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार असून उमेदवारांना ती अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येईल. या निर्णयाचे रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. मात्र, केवळ परीक्षा रद्द करणे पुरेसे नसून आधी झालेल्या गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Antilia Case : परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न; सेवानिवृत्त ACP बी. आर. घाडगेंची कोर्टात याचिका, सोमवारी सुनावणी

तसेच, नव्याने घेण्यात येणारी टंकलेखन परीक्षा स्वतंत्र आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता नव्या परीक्षेची तारीख आणि परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जाणार, याकडे लिपिक पदाच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Bombay hc clerk typing test cancelled technical issues new date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 09:48 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Paper Leak Case
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Bombay High Court : मुंबईत दिवाळीला फटाक्यांवर बंदी? डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सबाबतही उच्च न्यायालयाचे दिले महत्वाचे निर्देश
1

Bombay High Court : मुंबईत दिवाळीला फटाक्यांवर बंदी? डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सबाबतही उच्च न्यायालयाचे दिले महत्वाचे निर्देश

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू
2

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश
3

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
4

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.