Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: दुष्काळात अळीचा घाला! तुरीच्या शेंगा पोखरल्या, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Buldhana Helicoverpa Caterpillar Attack on Tur Crop: बुलढाणा जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकावर आता हेलिकोव्हर्पा अळीने मोठा हल्ला केला असून, शेंगांमधील दाणे फस्त केल्याने ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 02, 2026 | 07:55 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात शेतकरी संकटात
  • पावसाने रडवले, आता अळीने झोप उडवली
  • बुलढाण्यात बळीराजाची दुहेरी कोंडी
बुलढाणा: जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी आधीच कोरड्या दुष्काळाच्या खाईत लोटला गेला. जिल्ह्यात तुरीचा ९९५२१.६ हेक्टरवर पेरा करण्यात आला. त्यातच आता तुरीच्या पिकावर हेलिकोव्हर्पा अळीने हल्लाबोल केल्याने बळीराजा पुरता कोलमडला. शेतात डोलणारे पीक अचानक माना टाकू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. तुरीला फुलोरा येऊन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला.

Khamgaon Accident: कार अपघातात दोघांचा मृत्यू, अपघातग्रस्त वाहनात आढळला २६ किलो गांजा; टेंभुर्णा येथे ट्रकने दिली धडक

हिरव्यागार दिसणाऱ्या शेंगा वरून चांगल्या दिसत असल्या तरी आतून अळीने सर्व दाणे फस्त केले आहेत. एका शेंगात २-३ अळ्या आढळत असून, ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान इवल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. खत, औषध फवारणीला हजारो रुपये खर्च केले. पावसाअभावी पिकाला जगवण्यासाठी टँकरने पाणी दिले. आता पीक हातात यायच्या वेळीच अळीने सगळे संपवले, अशी व्यथा देऊळगाव राजा तालुक्यातील एका शेतकऱ्याने मांडली. गेल्या २ महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा संपला आहे. विहिरी, बोअरवेलनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत तुरीसारखे काटक पीक तरी आधार देईल, अशी आशा होती. मात्र, अळीच्या हल्ल्याने ती आशाही मावळली आहे.

रब्बीची पेरणीवर संकट

तुरीच्या पाठोपाठ हरभरा आणि रब्बीची पेरणीही खोळंबली असून, शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बँकेचे कर्ज, सावकाराचे व्याज आणि घरखर्च याचा मेळ कसा घालायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

शेतकऱ्यांसाठी माजी आमदारांचे उपोषणास्त्र

पिकांसाठी राखीव साठ्याव्यतिरिक्त पाणी देण्यास जिल्हा प्रशासन सकारात्मक असतांनाही तांत्रिक कारणे सांगून काल पेनटाकळी प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पिकासाठी पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माजी आ. संजय रायमुलकर सोमवारी सकाळी पैनगंगा नदीपात्रात मेहकर येथे बेमुदत उपोषणासाठी बसणार आहेत.

शनिवारी पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून आणि पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार होते. खरिपाची तूर, हळद, कपाशी ही पिके वाचवून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सिंचन प्रकल्पातील राखीव साठ्या व्यतिरिक्तचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत अनेक बैठका घेतल्या. याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिकाही घेतली होती.

Khamgaon: कापूस विक्री होणार अधिक पारदर्शक; ‘कपास किसान’ ॲपबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, CCI ची खास मोहीम

Web Title: Buldhana helicoverpa caterpillar attack tur crop damage farmer crisis pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • buldhana news
  • Crisis on farmers

संबंधित बातम्या

Khamgaon Accident: कार अपघातात दोघांचा मृत्यू, अपघातग्रस्त वाहनात आढळला २६ किलो गांजा; टेंभुर्णा येथे ट्रकने दिली धडक
1

Khamgaon Accident: कार अपघातात दोघांचा मृत्यू, अपघातग्रस्त वाहनात आढळला २६ किलो गांजा; टेंभुर्णा येथे ट्रकने दिली धडक

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती
2

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती

Farmers Demand Water Loan : चक्क पाण्यासाठी हवंय कर्ज! शेतकऱ्यांची अनोखी आणि आक्रमक मागणी; पिकं वाचवण्यासाठी आंदोलन
3

Farmers Demand Water Loan : चक्क पाण्यासाठी हवंय कर्ज! शेतकऱ्यांची अनोखी आणि आक्रमक मागणी; पिकं वाचवण्यासाठी आंदोलन

Buldhana News : पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!
4

Buldhana News : पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.