Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : मृग नक्षत्र तोंडावर; पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी, मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

मृग नक्षत्र अवघ्या तीन दिवसांवर आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीपपूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. वेळेवर पाऊस पडून मृगात पेरणी झाल्यास उत्पादन वाढण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 04, 2026 | 09:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बुलढाणा : खरीप हंगामाची चाहूल लागली असून मृग नक्षत्र अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. रब्बी हंगामानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. वेळेवर पाऊस पडून मृगात पेरणी झाल्यास चांगले उत्पादन मिळते, असा अनुभव असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.

Tukaram Mundhe: ६ दिवसांत २०३ छापे, १०२ अटक; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईक, ६८ दुकाने-हॉटेल्स सील!

शेती हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने पावसाचे आगमन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. योग्य वेळी पाऊस झाल्यास पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते. मात्र, बदलत्या हवामानामुळे गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

पूर्वी शेतीची बहुतांश कामे बैलजोडी आणि मजुरांच्या मदतीने केली जात होती. आता मात्र शेतीत मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले आहे. ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर यांसारख्या यंत्रांच्या सहाय्याने मशागतीपासून काढणीपर्यंतची कामे वेगाने होत आहेत. मात्र डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शेतीचा खर्चही लक्षणीय वाढला आहे.

ग्रामीण भागात मजुरांची कमतरता हीदेखील मोठी समस्या ठरत आहे. बांधकाम आणि इतर क्षेत्रांमध्ये अधिक मजुरी मिळत असल्याने अनेक मजूर शेतीपासून दूर गेले आहेत. त्यामुळे कापूस वेचणी, सोयाबीन सोंगणी, उडीद-मुग तोडणी यांसारख्या कामांसाठी शेतकऱ्यांना बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहेत.

गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी तसेच विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे शेती व्यवसाय अधिकच संकटात सापडला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीचा वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच उत्पादित मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अडचणी वाढत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे अल्पशा आजाराने निधन, काँग्रेसला मोठी हानी

अशा परिस्थितीत खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास पेरण्या वेळेत पूर्ण होऊन यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Web Title: Buldhana news mrig nakshatra just around the corner farmers await the rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News : करडा येथे शेतकरी चर्चासत्र; रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याचे आवाहन
1

Washim News : करडा येथे शेतकरी चर्चासत्र; रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याचे आवाहन

Buldhana News : नागेशवाडीत ५७ सागवान वृक्षांची तोड; वनविभागाचा पंचनामा, चौकशीची मागणी
2

Buldhana News : नागेशवाडीत ५७ सागवान वृक्षांची तोड; वनविभागाचा पंचनामा, चौकशीची मागणी

Buldhana News : शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्वेक्षणाला प्रारंभ; ९ लाखांहून अधिक नागरिकांची होणार तपासणी
3

Buldhana News : शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्वेक्षणाला प्रारंभ; ९ लाखांहून अधिक नागरिकांची होणार तपासणी

Buldhana News : शेगाव आणि शिर्डीत उभारले जाणार फूड स्ट्रीट हब; केंद्र सरकारकडून २ कोटींचा निधी मंजूर
4

Buldhana News : शेगाव आणि शिर्डीत उभारले जाणार फूड स्ट्रीट हब; केंद्र सरकारकडून २ कोटींचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.