Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : करडा येथे शेतकरी चर्चासत्र; रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याचे आवाहन

करडा येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन व रासायनिक खतांच्या संतुलित वापराबाबत शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. डॉ. आर. एल. काळे यांनी मृदा परीक्षणाच्या आधारे खतांचा वापर करण्यासह सेंद्रिय व जैविक खतांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 04, 2026 | 09:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

वाशिम : कृषी विज्ञान केंद्र, वाशिम यांच्या वतीने करडा येथील गजानन महाराज मंदिर परिसरात खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन व रासायनिक खतांचा संतुलित वापर या विषयावर शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राला परिसरातील शेतकरी, ग्रामीण युवक-युवती, महिला बचत गटांच्या सदस्यांसह कृषी व पशुसखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नितीन गडकरींची ‘३१ मे’ची डेडलाईन फेल! मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपूर्ण; कोकणवासियांचा प्रवास पुन्हा खडतर

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान तज्ज्ञ तुषार देशमुख आणि गृह विज्ञान तज्ज्ञ शुभांगी वाटाणे यांनी उपस्थितांना विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. आर. एल. काळे यांनी रासायनिक खतांचा असंतुलित वापर मातीच्या सुपीकतेवर तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी मृदा परीक्षणाच्या आधारे खतांचा वापर करणे आवश्यक असून, सेंद्रिय आणि जैविक खतांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच एकात्मिक पोषण व्यवस्थापनाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्यासह जमिनीचे आरोग्य जपता येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. काळे यांनी पुढे सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. बदलत्या हवामानाचा आणि वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी वैज्ञानिक शेती पद्धती स्वीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कृषी विज्ञान तज्ज्ञ तुषार देशमुख यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिके असलेल्या सोयाबीन, तूर, कापूस तसेच इतर पिकांसाठी शिफारस करण्यात आलेल्या खत व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रमुख अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या संतुलित वापराचे महत्त्व पटवून दिले. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खतांचा वापर केल्यास उत्पादन वाढीसोबतच उत्पादन खर्चातही बचत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी माती परीक्षणाचे महत्त्व, एकात्मिक पोषण व्यवस्थापन, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर आणि जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी नियमितपणे माती परीक्षण करून त्यानुसार खत व्यवस्थापन करावे, असे आवाहन करण्यात आले. गृह विज्ञान तज्ज्ञ शुभांगी वाटाणे यांनी कृषी विकासामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ग्रामीण महिलांनी पोषण बागांची निर्मिती, सेंद्रिय खतनिर्मिती तसेच कृषिपूरक उद्योगांमध्ये सहभाग वाढविल्यास कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. शाश्वत शेतीसाठी महिलांचा सहभाग आणि कौटुंबिक पातळीवरील विविध उपक्रमांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

Buldhana News : नागेशवाडीत ५७ सागवान वृक्षांची तोड; वनविभागाचा पंचनामा, चौकशीची मागणी

चर्चासत्रादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. शेतीतील वाढता खर्च, खतांचा योग्य वापर, पिकांचे पोषण व्यवस्थापन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीतील आव्हाने याबाबतही चर्चा झाली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन शुभांगी वाटाणे यांनी केले. यावेळी कल्याणराव देशमुख, झनकराव देशमुख, किशनराव देशमुख, दीपक देशमुख, कृषी सखी शारदा देशमुख, स्वाती देशमुख, व्यंकटराव देशमुख, नारायणराव जाधव, सुचिता देशमुख यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्रामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Web Title: Farmers seminar held at karada appeal made for the balanced use of chemical fertilizers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • buldhana news

संबंधित बातम्या

Buldhana News : नागेशवाडीत ५७ सागवान वृक्षांची तोड; वनविभागाचा पंचनामा, चौकशीची मागणी
1

Buldhana News : नागेशवाडीत ५७ सागवान वृक्षांची तोड; वनविभागाचा पंचनामा, चौकशीची मागणी

Buldhana News : मृग नक्षत्र तोंडावर; पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी, मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
2

Buldhana News : मृग नक्षत्र तोंडावर; पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी, मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

Buldhana News : शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्वेक्षणाला प्रारंभ; ९ लाखांहून अधिक नागरिकांची होणार तपासणी
3

Buldhana News : शून्य कुष्ठरुग्ण गाव सर्वेक्षणाला प्रारंभ; ९ लाखांहून अधिक नागरिकांची होणार तपासणी

Buldhana News : शेगाव आणि शिर्डीत उभारले जाणार फूड स्ट्रीट हब; केंद्र सरकारकडून २ कोटींचा निधी मंजूर
4

Buldhana News : शेगाव आणि शिर्डीत उभारले जाणार फूड स्ट्रीट हब; केंद्र सरकारकडून २ कोटींचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.