Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : पर्यावरण दिनीच वृक्षतोड; खामगाव नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, पर्यावरणप्रेमींचा आंदोलनाचा इशारा

जागतिक पर्यावरण दिनीच खामगाव नगर परिषदेकडून वृक्षतोड झाल्याचा आरोप होत असून पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात आणि घाटपुरी नाका भागात दोन मोठी झाडे तोडण्यात आली, तर नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे आणखी दोन झाडे वाचली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 07, 2026 | 08:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Buldhana News : एकीकडे संपूर्ण देशात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला जात असताना आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश दिला जात असताना, दुसरीकडे खामगाव शहरात घडलेल्या एका घटनेने पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दिवशीच खामगाव नगर परिषदेकडून वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप होत असून या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ईस्राइल मध्ये स्थापन होणार छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा! महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण!

माहितीनुसार, खामगाव रेल्वे स्टेशनसमोरील परिसरात नगर परिषदेकडून अस्थायी दुकाने उभारण्यात आली आहेत. तसेच घाटपुरी नाका परिसरातील नाल्याच्या बांधकामाचे कारण देत शुक्रवारी दुपारी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या भागातील मोठ्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली. पर्यावरण दिनाच्याच दिवशी दोन मोठी झाडे पूर्णपणे तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे आणखी दोन झाडांची तोड तात्पुरती थांबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेमुळे शहरातील पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी प्रशासनाच्या या कृतीवर टीका करत विकासकामांच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिला जात असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला शासन आणि विविध सामाजिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला अनेक वर्षे परिसराला सावली देणाऱ्या वृक्षांची तोड होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

तरुणाई फाउंडेशनचे सचिव राजेंद्र कोल्हे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातो. मात्र त्याचवेळी झाडांची तोड केली जात असेल तर ती चिंतेची बाब आहे. विकासकामे आवश्यक असली तरी पर्यावरणीय नियमांचे पालन करणे आणि पर्यायी वृक्षारोपण करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा पर्यावरण दिन केवळ औपचारिकता ठरेल, असे त्यांनी म्हटले.

पक्षीमित्र संजय गुरव यांनीही प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. केवळ पर्यावरण दिन साजरा करून किंवा पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देऊन उपयोग होणार नाही. प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. नवीन झाडे लावण्यापेक्षा सध्या अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन कसे करता येईल यावर प्रशासनाने अधिक भर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पर्यावरणप्रेमींचा सत्कार करण्यापेक्षा अनावश्यक वृक्षतोड रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नवसंकल्प फाउंडेशनच्या सचिव वैष्णवी गोलाईत यांनी सांगितले की, युवक मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण मोहिमांमध्ये सहभागी होतात. मात्र त्याच दिवशी झाडांची तोड होत असल्याचे पाहून निराशा वाटते. पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण धोरण आणि जनसहभागाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यावरणप्रेमी बेटी गव्हांदे यांनीही या घटनेबाबत खंत व्यक्त केली. पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातो, पण त्याचवेळी शहरात वृक्षतोड होत असेल तर त्या संदेशाचे महत्त्व कमी होते. नवीन झाडे लावणे महत्त्वाचे असले तरी आधीपासून अस्तित्वात असलेली झाडे वाचवणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Baramati Police: बारामती तालुका पोलिसांची गरुड झेप! ६ महिन्यांत शोधले २२ महागडे मोबाईल; ४ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे खामगाव नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीची चौकशी करण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी ठोस धोरण आखण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही पर्यावरणप्रेमींनी दिला असून येत्या काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Buldhana news tree felling on environment day itself questions raised over khamgaon municipal councils functioning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News : ‘पीएम राहत योजना’ अपघातग्रस्तांसाठी ठरणार जीवनदायी; गोल्डन अवरमध्ये मिळणार 1.50 लाखांपर्यंत रोखरहित उपचार
1

Washim News : ‘पीएम राहत योजना’ अपघातग्रस्तांसाठी ठरणार जीवनदायी; गोल्डन अवरमध्ये मिळणार 1.50 लाखांपर्यंत रोखरहित उपचार

Washim News : वाशिम जिल्ह्यातील ७६८ शेतकरी गटांचा फार्मर ग्रुप लीग स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग
2

Washim News : वाशिम जिल्ह्यातील ७६८ शेतकरी गटांचा फार्मर ग्रुप लीग स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा ‘आदर्श’ कारभार; ठेकेदाराच्या बिलापोटी 25 हजारांची स्वीकारली लाच
3

वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा ‘आदर्श’ कारभार; ठेकेदाराच्या बिलापोटी 25 हजारांची स्वीकारली लाच

Buldhana News : भादोला वन बीटमध्ये अवैध मुरुमाचे उत्खनन! २ ट्रॅक्टर, १ जेसीबी जप्त; वनविभागाची कारवाई
4

Buldhana News : भादोला वन बीटमध्ये अवैध मुरुमाचे उत्खनन! २ ट्रॅक्टर, १ जेसीबी जप्त; वनविभागाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.