Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: १५,४११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, वीज वितरणचा सापत्नभाव; श्रीमंतांना अभय, सर्वसामान्यांची कापली वीज

Buldhana Mahavitaran Power supply disconnected: बुलढाणा जिल्ह्यात थकीत वीजबिलाच्या वाढत्या रकमेवर नियंत्रण मिळवण्यासाठी महावितरणने मोठी कारवाई करत १५,४११ घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 25, 2026 | 01:23 PM
Buldhana News: १५,४११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, वीज वितरणचा सापत्नभाव; श्रीमंतांना अभय, सर्वसामान्यांची कापली वीज
Follow Us
Follow Us:
  • १५,४११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
  • श्रीमंतांना अभय, सर्वसामान्यांची कापली वीज
  • पुढे कठोर कारवाई
बुलढाणा, ब्युरो: थकीत वीजबिलाच्या वाढत्या आकड्‌यामुळे महावितरणने आता कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यातील हजारो थकबाकीदार ग्राहकांवर थेट वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, १५ हजार ४११ घरगुती वीज ग्राहकांचा वीजपुरवठा करण्यात आला आहे. बंद एवढेच नव्हे; तर दीर्घकाळ थकबाकी न भरलेल्या १ लाख ८१ हजार ८९१ ग्राहकांचे वीज मीटरही काढून घेण्यात आल्याचे महावितरणच्या दप्तरी नोंद असलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात ४ लाख ६४ हजार २८३ घरगुती वीज ग्राहक आहेत.

Farmers News: विदर्भात २६ टक्के पेरणी बाकी, राज्यात अमरावती विभाग आघाडीवर, जिल्ह्यांमध्ये बुलढाणा ‘टॉप’

या ग्राहकांकडे ५२ कोटी ९६ लाख ५४ हजार रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. यापैकी १५ हजार ४११ ग्राहकांकडे तब्बल २४ कोटी ८३ लाख ११ हजार रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठाखंडित करण्यात आला आहे. महावितरणने थकबाकीदारांना वारंवार नोटिसा, जनजागृती आणि हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, अनेक ग्राहकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात आली. महसूल वसुलीला गती देण्यासाठी ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुढे कठोर कारवाई

अधिकाऱ्यांनी नागरिकांना थकीत वीजबिले तातडीने भरून वीजपुरवठा पूर्ववत करून घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा नियमानुसार वीजजोडणी कायमस्वरूपी तोडण्यासह पुढील कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

थकीत वीजबिल त्वरित भरून महावितरणला सहकार्य करा

थकबाकीची रक्कम भरल्यानंतर नियमानुसार वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. थकबाकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्राहकांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी आपल्याकडील थकीत बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले.

महावितरण बुलढाणाचे अधीक्षक अभियंता, धनंजय अहेर म्हणाले की, महावितरणच्या थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज तोडणी मोहीम सध्या सुरू असल्याने वीज ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी वीज बिलाचा भरणा करून विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवावा.

डिव्हिजननुसार ग्राहकांची संख्या

  • बुलढाणाः ११४९५६
  • खामगावः ११३३१२
  • मलकापूरः १२८६८५
  • मेहकरः १०७३३०
  • एकूण : ४६४२८३

वीज ग्राहक आणि थकबाकी

  • घरगुती वीज ग्राहक: ४,६४,२८३
  • थकबाकी ५२९६.५४
  • वीजपुरवठा खंडित ग्राहक: १५,४११
  • मीटर काढून घेतलेले ग्राहक : १८१८९१
Buldhana News : एसटी बसस्थानक परिसरात वृक्षारोपण! राज्य परिवहन विभागीय कार्यालयातर्फे पर्यावरणाचा संदेश

Web Title: Buldhana mahavitaran power disconnection electricity bill arrears recovery drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • buldhana news
  • Light Bill
  • Mahavitaran Department

संबंधित बातम्या

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’
1

Buldhana News: पावसाअभावी शेती संकटात,आर्थिक वर्ष पूर्णतः कोलमडले; कोरड्या दुष्काळाच्या छायेत ‘बळीराजा’

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश
2

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; मेहकर, सिंदखेडराजा अन् बुलढाणा तालुक्यात कारवाई, अवैध बायोडिझेल विक्रीचा पर्दाफाश

Buldhana News: ‘लेक लाडकी’ योजनेचा १२ हजार कुटुंबांना लाभ, मुलींच्या शिक्षणाला बळ; १४ हजार कुटुंबांची नोंदणी
3

Buldhana News: ‘लेक लाडकी’ योजनेचा १२ हजार कुटुंबांना लाभ, मुलींच्या शिक्षणाला बळ; १४ हजार कुटुंबांची नोंदणी

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन
4

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.