Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: दुष्काळग्रस्तांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

Chikhli Drought Revenue Officers Donated CM Relief Fund: चिखली तालुक्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, या उद्देशाने ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 15, 2026 | 06:10 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाच्या संकटात मदतीचा हात
  • ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन सीएम फंडला
  • चिखलीतील महसूल अधिकाऱ्यांचा निर्णय
चिखली: तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी तालुक्यातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, या उदात्त हेतूने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन कपात करण्याबाबतचे निवेदन तहसीलदार विजय सवडे यांना देण्यात आले.

Washim: कारंजा-वाशिम मार्गावर भीषण दुर्घटना! दोन मुख्याध्यापकांसह तिघांचा मृत्यू; परिसरात शोककळा

दुष्काळामुळे शेतकरीबांधवांसह ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून मदतीसाठी पुढे येणे महत्त्वाचे आहे. याच भावनेतून ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकारघेतला. यावेळी विदर्भ पटवारी संघाचे बुलढाणा उपविभाग अध्यक्ष योगेश भुसारी, चिखली तालुका सचिव रुपेश एकडे, बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्ष संजय डुकरे पाटील, मंडळ अधिकारी संघटनेचे संजय सरागे, बुलढाणा जिल्हा मंडळ अधिकारी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल सवडतकर, तलाठी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल जाधव, तसेच कल्पना वानखेडे, इंदु शेजोळ, नितीन काळे, सुनील डव्हळे व जय सिरसाट यांच्यासह चिखली तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्तांच्या मदती साठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी ही संकटाच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रेरणादायी संदेश देणारी आहे.या उपक्रमातून प्रशासनातील संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा अधोरेखित झाली.

प्रशासकीय संवेदनशीलता, माणुसकीचे दर्शन

ग्राम महसूल अधिकारी हे ग्रामीण भागातील नागरिक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळातील परिस्थितीची त्यांना जवळून जाणीव असते. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन कपात करण्याचाबत घेतलेला हा पुढाकार सामाजिक बांधिलकी, प्रशासकीय संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा आहे.

Buldhana: उत्पादन घटले; सोयाबीनचे दर वधारले, अपुऱ्या पावसाचा फटका; शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात

Web Title: Buldhana chikhli drought relief revenue officer donated one day salary cm fund pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता
1

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी
2

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

५००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा! दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीवरून शशिकांत शिंदेंनी केली सरकारवर टीका
3

५००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा! दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीवरून शशिकांत शिंदेंनी केली सरकारवर टीका

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल
4

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.