
Malkapur Navaratri DJ Noise Pollution
या मिरवणुकांमध्ये विहित मयदिपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना मोठा त्रास होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.या प्रकरणी अक्षय बाजीराव तोत्रे (रा. पाझर घाटमळा, चांडवली बु., जि. पुणे), शुभम सुपडा लहाने (रा. साखळी बु., जि. बुलढाणा), रामराज्य मलकापूरवाला साऊंडशी संबंधित व्यक्ती, परेश विलास पाटील (जळगाव खुर्द, जि. जळगाव), गौरव अनिल पाटील (सनी पॅलेस, खामगाव), शुभम बाळू अंधारे (अदमपूर, जि. अकोला), चिरज प्रकाश गलवाडे (पंचशील नगर, भुसावळ), आनंद जनार्दन वानखडे (खामगाव), अभिषेक रवींद्र चव्हाण (म्हसवेद, जि. सातारा) यांच्यासह एकूण १२ डीजे मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २२३(ख), २७०, २९३ तसेच पोलिस अधिनियमातील महाराष्ट्र संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.