Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा

Buldhana Farmer Drought News : बुलढाणा-खामगाव जिल्ह्यात ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, उडीद आणि कपाशीसह खरीप पिकांवर मोठे संकट ओढावले असून उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 23, 2026 | 05:12 PM
Buldhana Farmer Drought News

Buldhana Farmer Drought News

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा
  • पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात
  • शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा

बुलढाणा/खामगाव, जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे उशिरा झालेले आगमन, खरीप पेरण्यांना झालेला विलंब, त्यातच बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आलेले संकट जणू काही कमीच होते. त्यात भरीस भर म्हणजे पावसाने तब्बल ४५ ते ५० दिवसांपासून पावसाचा पडलेला खंड शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना असाच ठरला आहे. पावसाअभावी ऐन शेंगा वाद्यांनी भरलेले सोयाबीन, उडीद, मग तर कपाशीची खुंटलेली वाढ आणि बोंडांची संख्या पाहता उत्पादनात येणारी संभाव्य घट शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ निर्माण करणारी ठरणार असल्याने, लागवड खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. करपलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणत आहेत. तेव्हा शेतकऱ्यांना या दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विविध संघटनांसह शेतकरीवर्गातून होत आहे.

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद

यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला. खरीप पेरण्यासाठी शेती मशागतीची कामे जसे की, नांगरणी, वखरपाळी, कल्टीवेटर आणि रोटावेटर करण्याच्या वेळेत जिल्ह्यात डिझेलचा निर्माण झालेला तुटवडा, मशागतीसाठी अतिरिक्त मोजावी लागलेली किंमत आणि जेव्हा खरीप पेरणी योग्य शेती तयार करून शेतकरी पावसाची आतुरतेने मान्सूनच्या आकाशाकडे डोळे लावून वाट बघत होता तर मान्सूनच्या पावसाने देखील हुलकावणी दिली. रोहिणी आणि मृग नक्षत्रात सरासरी बरसणारा पाऊस यंदा ‘अल निनोचा’ प्रभावामुळे उशिराने दाखल झाला. परिणामी खरीप प्रेरणांना झालेला विलंब, त्यातच दुबार पेरणीचे ओढविलेले संकट या सर्वांचा सामना करीत पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीलपणाचा प्रत्यय आला.

पेरणीनंतर अधून मधून आलेल्या सरींवर सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका आणि कपाशीचे पीक जोमात बहरले होते. जेव्हा पिके फुलधारणा होऊन पापडी आणि शेंगांच्या अवस्थेत असताना पावसाने दिलेली उघड, त्यातच किडींचा वाढता प्रादुर्भाव किड नियंत्रणासाठी महागड्या औषधांची झालेली फवारणी आणि गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने दिलेली उघडीप खरीप सोयाबीन, उडीद, मूग, कपाशीचे पीक पपड़ी, शेंगा गळून पडण्यासह करपू लागल्याने शेतकऱ्यांवर लागवड खर्च देखील निघणार नसल्याने संकटच कोसळले आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदतीचा हात द्यावा, ही अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

वाडीचे, शेतकरी तेजराव मनस्कार म्हणाले की, ८ जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात पाऊस अत्यंत कमी पडल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सोयाबीनचे उत्पन्न आजब कमी झाले आहे. कपाशी, तुरीची वाढ झाली नाही. त्यामुळे कापूस आणि तुरीचे उत्पन्न होत नाही, केलेला खर्च सुद्धा यावर्षी निघणार नाही.

कोदरखेडचे, शेतकरी संदीप पाटील म्हणाले की, कर्जमाफीच्या पौषणा होतात. मात्र अटी-निकषांमुळे अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहतात. यंदा पावसाअभावी मोठे नुकसान झाले आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीसह पीक नुकसानीची भरीय भरपाई मिळणे गरजेचे आहे.

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई

Web Title: Buldhana drought farmer crop loss rain deficit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • buldhana news
  • Crisis on farmers
  • drought news

संबंधित बातम्या

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
1

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
2

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

Maharashtra Drought : बळीराजाला बाप्पा पावणार! राज्य सरकार शनिवारपूर्वी पहिली अधिसूचना काढणार, फडणवीसांची मोठी घोषणा
3

Maharashtra Drought : बळीराजाला बाप्पा पावणार! राज्य सरकार शनिवारपूर्वी पहिली अधिसूचना काढणार, फडणवीसांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
4

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.