Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: ‘जिगाव ‘साठी ३५ हजार कोटी द्या; केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे ना. प्रतापराव जाधव यांची मागणी

35000 Crore Funding Jigaon Project Prataprao Jadhav: बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील २८७ गावांमधील १ लाख १६ हजार ७७० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्यासाठी जिगाव प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 16, 2026 | 07:10 PM
Prataprao Jadhav

Prataprao Jadhav

Follow Us
Follow Us:
  • बुलढाणा-अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
  • जिगाव प्रकल्पाला ३५ हजार कोटींची गरज
  • शेतकऱ्यांसाठी प्रतापराव जाधवांची मोठी मागणी
बुलढाणा: बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतजमिनी सिंचनाखाली आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिगाव प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी प्रस्तावित ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली.जिगाव प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर आणि खामगाव या सहा तालुक्यांसह अकोला जिल्ह्यातील बाळापूर व तेल्हारा या दोन तालुक्यांतील एकूण २८७ गावांमधील १ लाख १६ हजार ७७० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

Buldhana: दुष्काळग्रस्तांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

या प्रकल्पाची जलसंचय क्षमता २६.०१ टीएमसी असून, पहिल्या टप्यातील सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती देण्यासाठी केंद्रीय जल आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई-पॅम्स अर्थात इलेक्ट्रॉनिक प्रकल्प मूल्यांकन व्यवस्थापन प्रणालीद्वारे प्रस्ताव सादर करण्यात आला, या संदर्भात आयोजित बैठकीला आपण स्वतः उपस्थित होतो. बैठकीत आवश्यक दिशा निश्चित करण्यात आली असून, उर्वरित कामांसाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षांकडे करण्यात आली. यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची – पूर्तताही करण्यात आली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रात नमूद केले.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रकल्प महत्त्वपूर्ण

सध्या बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांत पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनानेही दुष्काळ जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिगाव प्रकल्प पूर्ण झाल्यास दोन्ही जिल्ह्यांतील मोठ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून, शेतीची उत्पादकता वाढविण्यास आणि भविष्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जिगाव प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक असलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीला केंद्र शासनाने तातडीने मंजुरी द्यावी आणि प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दि. १४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केली.

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल

Web Title: Buldhana jigaon project 35000 crore funding prataprao jadhav pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news
  • Prataprao Jadhav

संबंधित बातम्या

Buldhana: दुष्काळग्रस्तांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
1

Buldhana: दुष्काळग्रस्तांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल
2

Buldhana: मलकापुरात १२ डीजे मालकांविरुद्ध गुन्हा, दुर्गा स्थापना मिरवणुकीतील डीजेला दणका; आवाजाची नोंद १२०.४ डेसिबल

Buldhana: उत्पादन घटले; सोयाबीनचे दर वधारले, अपुऱ्या पावसाचा फटका; शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात
3

Buldhana: उत्पादन घटले; सोयाबीनचे दर वधारले, अपुऱ्या पावसाचा फटका; शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात

हातात मोबाइल, वाचनालयांत शुकशुकाट! बुलढाण्यात ३३७ ग्रंथालये; ३१ नावापुरतीच, डिजिटल युगाचा वाचन संस्कृतीला फटका?
4

हातात मोबाइल, वाचनालयांत शुकशुकाट! बुलढाण्यात ३३७ ग्रंथालये; ३१ नावापुरतीच, डिजिटल युगाचा वाचन संस्कृतीला फटका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.