नवजात बाळाच्या पोटात दोन मृत अर्भक, यशस्वी शस्त्रक्रिया; देशातील पहिलीच घटना (फोटो सौजन्य-X)
Buldhana New Born Baby In Marathi : बुलढाणा जिल्ह्यात एक दुर्मीळ घटना समोर आली आहे. एक गर्भवती महिला तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असता, गर्भवती महिलेच्या अर्भकाच्या पोटामध्ये अर्भक असल्याचं आढळून आलं आहे. वैद्यकीय भाषेत ‘फेटस इन फेटू’ असे म्हटले जाणारे हे गर्भधारणेचे स्वरूप निरर्थक आहे. एक गर्भवती महिला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आली असता तिथे हा धक्कादायक प्रकार समोर आला. डॉक्टरांनी महिलेची सोनोग्राफी केल्यानंतर यावेळी बाळाच्या पोटात असलेलं बाळ स्पष्टपणे दिसत होतं. मात्र त्यानंतर या प्रसुतीनंतर नवजात बाळाच्या पोटातून एक नव्हे तर दोन मृत अर्भक बाहेर काढण्यात आले आहे. या महिलेचं वय 32 वर्ष असून तिला याआधी दोन अपत्यं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातून एका नवजात बाळाच्या पोटात दोन मृत अर्भक बाहेर काढण्यात आले आहे. ही शस्त्रक्रिया अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली. या नवजात बाळाचे वय फक्त तीन दिवसाचे आहे. नवजात बाळाच्या पोटातील दोन्ही अर्भक तीन इंचाचे होते. त्या नवजात बाळाच्या पोटात दोन्ही अर्भकाचे शरीर तयार झाले होते. या नवजात बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी, ५ डॉक्टर, ४ परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसह १२ जणांची टीमने यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाच्या शरीरावर १२ टाके पडले. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
बुलढाण्यातील या नवजात बालकांना उपचारासाठी अमरावतीच्या विभागीय रेफरल रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांसाठी शस्त्रक्रिया हे एक मोठे आव्हान होते, पण त्यांनी त्यावर मोठ्या यशाने मात केली. शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या वडिलांना डॉक्टरांचे आभार मानले. ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाची घटना मानली जाते, कारण अशी घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे. डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मुलाचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.हे अतिशय दुर्मिळ अशी परिस्थिती असून आतापर्यंत जगात फक्त २०० तर आपल्या देशात ९ ते १० अशा घटना समोर आल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील इतिहासात बुलडाण्यात पहिल्यांदा अशा प्रकारची घटना समोर आली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
Dhananjay Munde Alligations: ‘माझं राजकीय करीयर संपवण्याचा प्रयत्न…’; धनंजय मुंडेंचा आरोप कुणावर