Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: ३० टन कांद्याचा ट्रक पळवणारे गजाआड, ‘समृद्धी’वर चालकाला केली होती मारहाण; ट्रक अन् गुन्ह्यातील कार जप्त

Samruddhi Expressway onion truck robbery: समृद्धी महामार्गावर कार आडवी लावून ट्रकचालकाला मारहाण करत ३० टन कांद्याने भरलेला ट्रक पळविणाऱ्या चार संशयितांना महामार्ग व डोणगाव पोलिसांनी अटक केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 28, 2026 | 06:10 PM
Onion truck robbery on Samruddhi Expressway

Onion truck robbery on Samruddhi Expressway

Follow Us
Follow Us:
  • समृद्धी महामार्गावर कांद्याच्या ट्रकची लूट
  • चालकाला मारहाण करून ३० टन माल पळवला
  • ट्रक आणि कार पोलिसांनी केली जप्त
बुलढाणा: समृद्धी महामार्गावर कार आडवी लावून ट्रक चालकाला बेदम मारहाण करून कांद्याने भरलेला ट्रक पळविणाऱ्या ४ संशयितांच्या महामार्ग पोलिस व डोणगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तेजस विलास डोमणे, गौरव हरिभाऊ पानसरे, विश्वजीत निवृत्ती ढोमसे व आशूदेव दास (कोलकाता, पं. बंगाल) अशी आरोपींची नावे आहेत.आरोपींच्या ताब्यातून ३० टन कांद्याने भरलेला अपहृत ट्रक व गुन्ह्यात वापरलेली एमएच १५/ एच-९००४ क्रमांकाची कार पोलिसांनी जप्त केली.

या कारला चोरट्‌यांनी ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी व सायरन लावलेले आढळले. महामार्गावर प्रवासादरम्यान पोलिसांची धूळफेक करण्यासाठी असा प्रकार केल्याचे दिसून आल्याने तपास अधिक गंभीरपणे केला जात आहे. ट्रकचालक मिराज अहमद ऐजाज अहमद (२८, रा. थोन, जि. कौसंबी, उत्तर प्रदेश) हा सीजी ०४ /पीपी- ९११३ क्रमांकाचा ट्रकद्वारे नाशिक जिल्ह्यातून ३० टन ५६० किलो कांद्याची (किंमत ११ लाख ५० हजार) झारखंड राज्याकडे भाडेतत्त्वावर वाहतूक करत होता.

डोणगाव पोलिसांनी अमानी (ता. मालेगाव) च्या महामार्ग पोलिस चौकीला सतर्क केल्याने पीएसआय प्रकाश सरनाईक यांच्या पथकाने नाकाबंदी केली व अपहरण झालेला कांद्याचा ट्रक व संशयित स्कोडा कार अडवून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ संतोष खांडे, डोणगावचे ठाणेदार गणेश इंगोले, एपीआय राहूल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास डोणगाव पोलिस करीत आहेत.

घटनेने उडाली होती खळबळ

शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास समृद्धी महामार्गावर मेहकर ते मालेगाव दरम्यान डोणगावजवळ एका पांढऱ्या कारमधून आलेल्या अज्ञात ४ लुटारूंनी मार्गात कार आडवी लावून ट्रक अडवला होता. चालक मिराज अहेमद याला बेदम मारहाण करून त्याच्या ताब्यातील कांद्यासह भरलेला ट्रक (एकूण मुद्देमाल ३६ लाख ५० हजार) पळवून नेला होता. या घटनेने खळबळ उडाली होती.

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट

Web Title: Buldhana samruddhi expressway 30 ton onion truck robbery four arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • buldhana news
  • Onion News

संबंधित बातम्या

बुलढाण्यात १३ तालुके दुष्काळग्रस्त, शेतकऱ्यांना विविध सवलतींचा दिलासा; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश
1

बुलढाण्यात १३ तालुके दुष्काळग्रस्त, शेतकऱ्यांना विविध सवलतींचा दिलासा; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट
2

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश; चिखली-सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना भेट

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली
3

खडकपूर्णा प्रकल्पात ७ टक्केच जलसाठा; बुलढाणा जिल्ह्यात मोजक्याच प्रकल्पांतच पुरेसा साठा, पेयजल अन् सिंचनाची चिंता वाढली

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
4

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.