Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी

Dry Drought Declaration Ravikant Tupkar Demand: पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 05, 2026 | 05:46 PM
Dry Drought Declaration

Dry Drought Declaration

Follow Us
Follow Us:
  • पावसाची दडी, खरीप हंगाम संकटात
  • राज्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा
  • रविकांत तुपकरांची मागणी
बुलढाणा: पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ही गंभीर अवस्था लक्षात घेऊन शासनाने तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्य शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे राज्यात निर्माण झालेली विदारक परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देत तत्काळ ओल्ला दुष्काळ जाहीर करण्यासह इतर मागण्यांचे निवेदन बुधवारी सुपूर्द केले. यावेळी चर्चा करताना तुपकर यांनी महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटातून जात आहे.

चालू खरीप हंगामात अनेक भागांत पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. परिणामी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, मका यांसह विविध खरीप पिके पाण्याअभावी वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांवर मानसिक व आर्थिक ताण निर्माण होत आहे. पिकांची आणि शेतकऱ्यांची ही गंभीर अवस्था पाहता शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, मराठवाड़ा अध्यक्ष गजानन कावरखे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, अमोल मोरे, अॅड. प्रवीण सुरडकर, सुनील मिसाळ, बाळू पाटील, नितीन सोनटक्के, नीलेश राजपूत आदी उपस्थित होते.

खरीप हंगाम धोक्यात

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिकांची वाढ खुंटली असून पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी वियाणे, खते, औषधे, मशागत व इतर शेती खर्चासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिके हातातून जाण्याचे आणखी मोठे संकट उभे ठाकले आहे. दोन दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास संपूर्ण पिके नष्ट होऊन खरीप हंगाम हातातून जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकरी पुरते खचले आहेत.

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

Web Title: Maharashtra drought declare ravikant tupkar demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • buldhana news
  • drought news
  • Monsoon

संबंधित बातम्या

Buldhana News: एस-३ ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुलभ,राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे; बुलढाण्यात नवीन ईव्हीएम वापर
1

Buldhana News: एस-३ ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुलभ,राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे; बुलढाण्यात नवीन ईव्हीएम वापर

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
2

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक
3

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा
4

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.