Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: दुष्काळग्रस्त यादीत वाशिमचे सहाही तालुके समाविष्ट, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

Washim drought-like situation: खरीप २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट, पिकांची प्रतिकूल स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून वाशिम जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यांचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या ‘ट्रिगर-१’ यादीत समावेश करण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 28, 2026 | 07:08 PM
Washim drought-like situation:

Washim drought-like situation:

Follow Us
Follow Us:
  • वाशिमच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा
  • सहाही तालुके दुष्काळसदृश यादीत
  • सवलतींचा मिळणार लाभ
वाशिम: खरीप हंगामातील पर्जन्यमानातील तूट, पिकांची प्रतिकूल स्थिती आणि उपलब्ध पाणी परिस्थितीचा विचार करून वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत (ट्रीगर-१) समावेश करण्यात आला. याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय शनिवारी निर्गमित केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळात विविध उपाययोजना व सवलतींचा लाभ मिळावा, यासाठी राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले.खरीप २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट, पिकांची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून कृषी आयुक्तांच्या अहवालाच्या आधारे तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आढळून आली. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला.

Buldhana: ३० टन कांद्याचा ट्रक पळवणारे गजाआड, ‘समृद्धी’वर चालकाला केली होती मारहाण; ट्रक अन् गुन्ह्यातील कार जप्त

शेतकरी व नागरिकांना विविध सवलती : दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

झालेल्या भागात नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णयानुसार विविध उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये जमीन महसूल वसुलीस सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती तसेच कृषिपंपाच्या वीजबिलात सवलत यांचा समावेश आहे, जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत.

पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

शासन निर्णयानुसार बाधित भागातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्हा वाशिम,पालकमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले की, संकटकाळात शेतक-यांना पूर्ण पाठबळ देणे हे आमचे प्राधान्य आहे. शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील तालुक्यांचा दुष्काळसदृश यादीत समावेश झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती व मदत वेळेत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

बुलढाण्यात १३ तालुके दुष्काळग्रस्त, शेतकऱ्यांना विविध सवलतींचा दिलासा; पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

Web Title: Washim drought like situation six talukas trigger 1 farmer relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Dattatray Bharane
  • Maharashtra Drought 2026
  • Washim news

संबंधित बातम्या

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
1

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’
2

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’

Maharashtra Drought : ‘मराठवाड्यातील कुठल्याही तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही,’ अशोक चव्हाणांचा शब्द, दोन तालुक्यांवरून राजकारण
3

Maharashtra Drought : ‘मराठवाड्यातील कुठल्याही तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही,’ अशोक चव्हाणांचा शब्द, दोन तालुक्यांवरून राजकारण

Maharashtra Drought : महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट? एल निनोच्या प्रभावावर फडणवीसांनी सांगितलं पुढचं चित्र
4

Maharashtra Drought : महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट? एल निनोच्या प्रभावावर फडणवीसांनी सांगितलं पुढचं चित्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.