Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: चाराटंचाई निवारणासाठी नियोजन करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; जिल्हा प्रशासनातर्फे आढावा

Washim Fodder Management Yogi Kumbhejkar: वाशिम जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पशुधनासाठी चारा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्देश दिले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 14, 2026 | 07:13 PM
Washim Fodder Management

Washim Fodder Management

Follow Us
Follow Us:
  • वाशिममध्ये चारा व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन
  • जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश
  • १,८१४ लाभार्थ्यांना बियाणे वाटप
वाशिम: जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढविणे, वैरण बियाण्यांचे वाटप, वनक्षेत्रात चारा लागवड तसेच आवश्यकतेनुसार चारा डेपो व चारा छावण्यांच्या माध्यमातून जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

Buldhana: उत्पादन घटले; सोयाबीनचे दर वधारले, अपुऱ्या पावसाचा फटका; शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात

जिल्हा चाराटंचाई नियोजन आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सहाय्यक वनसंरक्षक मंठावार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढविण्यासाठी वैरण बियाणे पुरविण्याकरिता १ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे. विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पातून २० लाख रुपयांचे वैरण बियाणे वाटप प्रस्तावित आहे. सिंचनाची जमीन व पुरेसा पाणीसाठा असलेल्या ६४४ शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. चालू २०२६-२७ वर्षात ५१.७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, १ हजार ८१४ लाभार्थ्यांना १३ हजार ४४८ किलो वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. यातून ७२५ हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड आणि २४ हजार ६६४ मेट्रिक टन चारा उत्पादन अपेक्षित आहे.

रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढविण्यासाठी उपलब्ध योजनांचा प्रभावी वापर करावा तर वनक्षेत्रात चारा लागवडीवर अधिक भर देण्याची गरज आहे. असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ई-क्लास जमिनीवर व्कीबी-जी रामजी चारा लागवडीसाठी पशुसवंर्धन विभागाने प्रस्ताव सादर योजनेअंतर्गत करावेत. तसेच वन विभागाने कुरण क्षेत्रामधील चारा पशुसवंर्धन विभागामार्फत जनावरांना उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले आहे. ज्वारी व बाजरी यासारख्या कमी पावसात वाढणाऱ्या चारा पिकांची लागवड, कुटाराची योग्य साठवणूक व प्रक्रिया आणि चारा साक्षरता अभियान २०२६ राबविण्यावरही भर देण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार चारा डेपो व छावण्यांच्या माध्यमातून पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वाशिमचे जिल्हाधिकारी, योगेश कुंभेजकर म्हणाले की, जिल्ह्यात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी सादर केलेल्या नियोजनानुसार, २१ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ८९५ पशुधन असून, सप्टेंबर २०२६ अखेर १३ लाख २९ हजार १३८ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे, हा साठा एप्रिल ते मे महिन्यापर्यंत पुरेल, असे नियोजन आहे. चान्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन करावे.

Washim: रस्त्यावर ऑटो लावल्याने चालकावर हल्ला, रिसोडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना; पोलिसात तक्रार दाखल

Web Title: Washim fodder shortage management yogi kumbhejkar pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • animals
  • Maharashtra Drought 2026
  • Washim news

संबंधित बातम्या

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी
1

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई
2

Maharashtra Drought: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ; पैसे घेतल्यास कारवाई

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण
3

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण

Amravati News: सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर
4

Amravati News: सोयाबीन उत्पादन घटले; दर वधारले! अपुऱ्या पावसाचा फटका, बाजारात ६,८०० रुपये प्रतिक्विंटल दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.