गोंदिया : बिरसी विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र देखील आहे. येथील प्रशिक्षण केंद्रापैकी असलेल्या कॅनडा फ्लाईंग अकादमीने आणि नॅशनल फ्लाईंग अकादमी यांनी २०१९-२० पासून कराचा भरणा केला नाही. कराची रक्कम पाच लाखांच्यावर जावून पोहोचली आहे. तत्काळ कर भरावा अन्यथा ग्राम पंचायत अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे नोटिस कामठा ग्रामपंचायतीने बजावले आहे.
[read_also content=”११५५ सिकलसेलग्रस्त रुग्ण वाऱ्यावर, दोन वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित तर, जीवघेण्या आजाराकडे शासनाचे दुर्लक्ष https://www.navarashtra.com/maharashtra/1155-sickle-cell-patients-on-air-proposal-pending-for-two-years-government-ignores-life-threatening-disease-nraa-264245.html”]
तालुक्यातील बिरसी येथील इंग्रजकालीन विमानतळाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्या ठिकाणाहून आता प्रवासी विमान देखील उडू लागले आहे. विस्तीर्ण असे परिसर असल्याने आणि गोंदियातील वातावरण निरभ्र राहत असल्यामुळे येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र देखील तयार करण्यात आले आहे. कॅनडा फ्लाईंग अकादमी आणि नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे वैमानिक प्रशिक्षण देण्यात येते. देश-विदेशातील वैमानिक येथे प्रशिक्षण घेत आहेत. कॅनडा फ्लाईंग अकादमी आणि नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्याकरिता भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने बिरसी ग्राम पंचायतीच्या जागेवर इमारतीचे बांधकाम केले.
[read_also content=”महाविकास आघाडी सरकारचाच महावितरणचे खासगीकरण करण्याचा घाट- आ. चंद्रशेखर बावनकुळे https://www.navarashtra.com/maharashtra/the-mahavikas-aghadi-government-is-planning-to-privatize-msedcl-chandrasekhar-bavankule-nraa-264041.html”]
या जागेचा कर कामठा येथील ग्रामपंचायतीला नियमितरित्या देणे गरजेचे होते. परंतु, कॅनडा अकादमीने २०१९-२० ते २०२१-२२ पर्यत ५ लाख २४ हजार ५७१ रुपये तसेच नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्याकडे ३९ हजार ३२ रुपये असा एकूण ५ लाख ६३ हजार ६०३ रुपयांचा कर थकीत आहे. कराच्या वसुलीकरिता ग्रामपंचायतीने दोन्ही संस्थांना नोटिस बजावले असून वेळेत कराचा भरणा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.