Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिर्डीत संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल; ग्रामस्थ आणि साईभक्त आक्रमक

शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांनी साईबाबा व महापुरुषांविषयी केलेल्या बेछूट, अवमानकारक व संतापजनक वक्तव्याचे तीव्र पडसाद साईनगरीसह जगभरातील साईभक्तांमध्ये उमटले आहेत. साईबाबा संस्थानने या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 01, 2023 | 11:51 AM
शिर्डीत संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल; ग्रामस्थ आणि साईभक्त आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी : शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांनी साईबाबा व महापुरुषांविषयी केलेल्या बेछूट, अवमानकारक व संतापजनक वक्तव्याचे तीव्र पडसाद साईनगरीसह जगभरातील साईभक्तांमध्ये उमटले आहेत. साईबाबा संस्थानने या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सर्वपक्षीय ग्रामस्थांनीही भिडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन शिर्डी पोलिसांना दिले आहे. दोन दिवसांपूर्वी भिडे यांनी अमरावती येथील जाहीर सभेत साईबाबांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते.

या संदर्भात शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची सोमवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत ग्रामस्थांनी भिडे यांच्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना भिडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदनही दिले.

यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवाजी गोंदकर, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, नीलेश कोते, सचिन शिंदे, नितीन उत्तमराव कोते, रवींद्र गोंदकर, दीपक वारूळे, संदीप सोनवणे, विजय जगताप दत्तात्रय कोते, देवराम सजन, सर्जेराव कोते, नितीन अशोक कोते, विकास गोंदकर, मंगेश त्रिभुवन, सचिन वाणी, अमोल कोते, विशाल कोते, अविनाश गोंदकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने साईसंस्थानचे डेप्युटी सीईओ राहुल जाधव यांची भेट घेऊन संस्थानने या प्रकरणी कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. यानंतर जाधव यांनी वरिष्ठांशी व व्यवस्थापनाशी चर्चा करून भिडे यांच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संस्थानचे संरक्षण प्रमुख आण्णासाहेब परदेशी यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘तो’ फोटो झाला व्हायरल

सांगलीतील साईमंदिरात काही वर्षांपूर्वी भिडे साईबाबांची आरती करतानाचा फोटोही समाज माध्यमांत फिरत आहे. एकीकडे भिडे साईबाबांची आरती करतात व दुसरीकडे साईबाबांच्या मूर्ती घराबाहेर काढण्याचे आवाहन करतात. या दुटप्पीपणाकडे शिर्डीकरांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Case filed against sambhaji bhide in shirdi aggressors of villagers and sai devotees nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2023 | 11:51 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • sambhaji bhide
  • shirdi

संबंधित बातम्या

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना
1

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका
2

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा
3

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा

Chakan News : फेज 2 मधील एमआयडीसी अंतर्गत मार्गावर कचऱ्याचा भडका; प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे नागरिक त्रस्त
4

Chakan News : फेज 2 मधील एमआयडीसी अंतर्गत मार्गावर कचऱ्याचा भडका; प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे नागरिक त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.