सोलापूर : ‘आझादी का अमृतमहोत्सव’अंतर्गत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्ग नवी दिल्ली १३ व १४ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (CEO Dilip Swami) यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
‘आझादी का अमृतमहोत्सवा’निमित्त सोलापूर जिल्ह्यात प्रभावी उपक्रम राबविण्यात आले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्यात सुरूच आहे. ११ ते १७ एप्रिल या कालावधीत आयकाॅनिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातून दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पंढरपूरचे गटविकास अधिकारी किरण काळे, माळशिरसचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, विस्तार अधिकारी किसन खरात, भेंडचे सरपंच डाॅ. संतोष दळवी, ग्रामसेवक कैलास सुरवसे, पाणीव चे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल चव्हाण, भेंडचे ग्रामसेवक महादेव देवकते यांना देखील या कार्यक्रमासाठी खास निमंत्रक करण्यात आले आहे.
केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाच्या सहभागी होणार आहेत. नवी दिल्ली येथे होणारे कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातून ९ जणांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्याची मान उंचावली आहे. या उपक्रमास सोलापूर जिल्ह्यात या उपक्रमांत चांगले काम केले आहे. पंढरपूर तालुक्यांतील भोसे येथे पाच हजार लोकांनी एकत्रीत येऊन राष्ट्रीगीत गायन केले होते.