Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाईपलाईन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश; विना अडथळा आता करता येणार खोदकाम

पाईपलाईन टाकताना विविध परवानग्या, जास्त शुल्क, जमीन उपलब्धतेतील अडचणी आणि रहिवासी संघटनांकडून होणारा विरोध यामुळे प्रकल्पांमध्ये विलंब होत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 26, 2026 | 01:18 PM
पाईपलाईन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश; विना अडथळा आता करता येणार खोदकाम

पाईपलाईन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश; विना अडथळा आता करता येणार खोदकाम

Follow Us
Follow Us:

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणाला गती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत नवीन आदेश जारी केला आहे. 24 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आदेशानुसार गॅस पाईपलाईन टाकणे, देखभाल, विस्तार आणि संबंधित सुविधा उभारणीसाठी एक सुसंगत नियमावली लागू करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशन कोअर कमिटी सदस्य अली दारूवाला यांनी दिली.

अली दारूवाला यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या या आदेशामुळे घरगुती ग्राहकांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) पुरवठा वाढवण्यावर भर देण्यात आला असून, एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे. ज्या भागांमध्ये नैसर्गिक गॅस पाईपलाईन उपलब्ध आहे, तेथे एलपीजी ऐवजी पीएनजी वापरास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, पाईपलाईन टाकताना विविध परवानग्या, जास्त शुल्क, जमीन उपलब्धतेतील अडचणी आणि रहिवासी संघटनांकडून होणारा विरोध यामुळे प्रकल्पांमध्ये विलंब होत होता. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी नवीन नियमांमध्ये परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. या आदेशानुसार, सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील संस्थांना ठराविक कालमर्यादेत पाईपलाईनसाठी परवानगी देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच, परवानगी वेळेत न दिल्यास ती ‘स्वतःच मंजूर’ झालेली मानली जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, निवासी भागांमध्ये पाईपलाइन टाकण्यास कोणीही अडथळा निर्माण करू शकणार नाही. जर नागरिकांनी पीएनजी कनेक्शन घेण्यास नकार दिला, तर ठराविक कालावधीनंतर त्या ठिकाणी एलपीजी पुरवठा बंद करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने इंधनाचे विविधीकरण आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले आहे.

देशांतर्गत गॅस वितरण मजबूत करण्यावर दिला जातोय भर

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणी, विशेषतः खाडी प्रदेशातील परिस्थिती लक्षात घेता, देशांतर्गत गॅस वितरण मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. या निर्णयामुळे देशातील सिटी गॅस वितरण प्रकल्पांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा असून, शहरी व ग्रामीण भागात स्वच्छ इंधनाचा वापर वाढण्यास मदत होणार असल्याचे दारूवाला यांनी स्पष्ट केले.

Gas Connection Rules 2026 : तुमच्या भागात PNG गॅस आलाय? 48 तासांत कनेक्शन घ्या, अन्यथा सिलिंडरचा पुरवठा होणार बंद!

Web Title: Central governments new order for piped gas and cng distribution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Central government
  • CNG Price
  • pune news

संबंधित बातम्या

Table Tennis: १ गेम गमावला अन् मग रचला इतिहास! उपेंद्र मुळेने सोलापूरच्या अनंत कुलकर्णीला धूळ चारली
1

Table Tennis: १ गेम गमावला अन् मग रचला इतिहास! उपेंद्र मुळेने सोलापूरच्या अनंत कुलकर्णीला धूळ चारली

पुणेकरांचा नाद खुळा! आंतरराष्ट्रीय Taekwondo स्पर्धेत 15 ‘सुवर्ण’ तर…; तब्बल 28 पदकांची कमाई
2

पुणेकरांचा नाद खुळा! आंतरराष्ट्रीय Taekwondo स्पर्धेत 15 ‘सुवर्ण’ तर…; तब्बल 28 पदकांची कमाई

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर
3

‘Maharashtra Energy Expo’ मध्ये पुणेकरांचे लक्ष! जेनस इनोव्हेशनकडून ‘हाय-फ्लो हायब्रिड सोलर इन्व्हर्टर’ सादर

Business Loan : सरकारचा महत्त्वाचा निर्णय! MSME ला मिळणार मोठा निधी! ग्रामीण भागात सहज कर्ज होणार उपलब्ध
4

Business Loan : सरकारचा महत्त्वाचा निर्णय! MSME ला मिळणार मोठा निधी! ग्रामीण भागात सहज कर्ज होणार उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.