मुंबई: रविवारी म्हणजे मुंबईकरांचा (Mumbai) हक्काचा सुट्टीचा दिवस, जर तुम्ही येत्या रविवारी बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर थांबा कारण ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेने 21 मे रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉकची (Mega Block In Mumbai) घोषणा केली आहे. कोणत्या मार्गावर किती वेळ मेगा ब्लॉक आहे ते जाणून घ्या.
माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 03.55 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 03.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा, मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचेल.
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत(बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्ग वगळून)
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणिछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.






