फोटो सौजन्य: iStock
‘नोबेल प्राइझ डायलॉग इंडिया २०२५’ हा विशेष संवाद कार्यक्रम ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान बेंगळुरू आणि मुंबई येथे होणार आहे. टाटा ट्रस्टस् यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात नोबेल पारितोषिक विजेते, जागतिक विचारवंत आणि भारतीय संशोधक एकत्र येऊन ज्ञान, सर्जनशीलता आणि तरुणांमध्ये गुंतवणुकीद्वारे अधिक समावेशक, शाश्वत आणि न्याय्य भविष्यकाळ कसा घडवता येईल यावर चर्चा करतील.
‘द फ्युचर वी वॉण्ट (The Future We Want)’ हा या संवादाचा विषय आहे. मजबूत लोकशाही व्यवस्था, नवोन्मेष आणि शिक्षणातील गुंतवणुकीमुळे देश प्रगती कशी साध्य करू शकतात यावर या कार्यक्रमाद्वारे विचारमंथन होईल.
नोबेल पारितोषिक विजेते डेव्हिड मॅकमिलन (केमिस्ट्री, २०२१) म्हणाले, “भारताला प्रथमच भेट देण्याच्या तसेच येथील विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांशी संवाद साधण्याच्या संधीबद्दल मी खूप उत्साहित आहे. भारतातील विज्ञानाबद्दलचं प्रेम प्रेरणादायी आहे आणि नवोन्मेषाच्या भविष्यासंदर्भात विचारांची देवाणघेवाण करण्यास मी उत्सुक आहे.”
मोठी बातमी! न्यायमूर्ती सूर्यकांत असतील भारताचे ५३ वे सरन्यायाधीश; जाणून घ्या कधी स्वीकारणार पदभार
या कार्यक्रमात जेम्स रॉबिन्सन (इकॉनॉमिक सायन्सेस, २०२४), डेव्हिड मॅकमिलन (केमिस्ट्री, २०२१) यांच्यासह टोलुल्लाह ओनी, गगनदीप कांग, मोंटेक सिंग अहलुवालिया आणि कुश परमार यांसारखे प्रतिष्ठित तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
नोबेल फाउंडेशनच्या एक्झिक्युटिव डायरेक्टर हॅना स्त्यार्न म्हणाल्या, “गेल्या १२५ वर्षांपासून मानवजातीच्या सर्वोच्च हितासाठी कार्य करणाऱ्यांचा नोबेल पारितोषिकाद्वारे सन्मान केला जात आहे. भारतातील संवादाच्या कथा आम्ही घेऊन येत आहोत — या कथा ज्ञान, सर्जनशीलता आणि सहयोगाचं महत्त्व अधोरेखित करतात. या प्रेरणादायी कथा भारतातील जनतेला नव्या भविष्याचा विचार करण्यास प्रवृत्त करतील.”
कर्नाटकमध्ये RSS टार्गेट? हायकोर्टाने दिली ‘त्या’ निर्णयाला स्थगिती; सिद्धरामय्या सरकारला दणका
टाटा ट्रस्टस् सीईओ सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितले, “टाटा ट्रस्टस् गेल्या शतकभराहून अधिक काळापासून दुर्लक्षित व सीमांत समुदायांच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे. समाजाचे ऋण फेडण्याची आमची परंपरा आणि अधिक चांगल्या भविष्यकाळाला आकार देणाऱ्या कल्पनांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची तत्त्वे आहेत. ‘नोबेल प्राइज आउटरीच’सोबतचा आमचा सहयोग ही सामायिक बांधिलकी मानवी प्रगती, नवोन्मेष आणि न्याय्य समाजनिर्मितीला प्रोत्साहन देणारी आहे.”
हा प्रतिष्ठित कार्यक्रम नोबेल प्राइज आउटरीच आणि टाटा ट्रस्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नोबेल इंटरनॅशनल पार्टनर्स एबीबी (ABB), ईक्यूटी (EQT), स्कॅनिया (Scania) आणि स्टेग्रा (Stegra) यांच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे.






