भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडला सेमीफायनल
जेमिमाह रॉड्रिग्सचे शानदार शतक
भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबईत हा सामना पार पडला. आजचा सामना जिंकत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत आता अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.
जेमिमाह रॉड्रिग्सने भारताकडून सर्वाधिक धावसंख्या केली. या सामन्यात तिने शानदार शतकी खेळी केली. रिचा घोष, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर यांनी देखील धडाकेबाज खेळी करत संघाला विजयापर्यंत पोहोचवले. स्मृती मंधना देखील चांगली सुरुवात करून दिली. भारताने 339 धावांचे लक्ष्य 48.3 ओव्हर्समध्येच 5 विकेट गमावत पूर्ण केले. आता भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
पहिल्या इनिंगमध्ये काय घडले?
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरवात खराब झाली.फोबी लिचफिल्ड आणि एलिसा हीली या सलामी जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. मात्र २५ धावांवर ऑस्ट्रेलियाला कर्णधार एलिसा हीलीच्या रूपात पहिला झटका बसला. ती ५ धावा करून क्रांति गौडची शिकार ठरली. त्यानंतर एलिस पेरी मैदानात आली.लिचफिल्ड आणि एलिस पेरी यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरालाच नाही तर संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. दरम्यान लिचफिल्डने फक्त ७७ चेंडूत शानदार शतक झळकावले. तिने ९३ चेंडूत ११९ धावा केल्या. यामध्ये तिने १५ चौकार मारले. तीला अमनजोत कौरने बाद केले. मात्र, तोपर्यंत लिचफिल्ड आणि एलिस पेरी या दोघींनी चौथ्या विकेट्ससाठी १५५ धावांची भागीदारी रचली होती. भारताला ऑस्ट्रेलियाला 339 धावांचे लक्ष्य दिले होते.
World Cup 2025. India (Women) Won by 5 Wicket(s) https://t.co/ou9H5gNDPT #TeamIndia #CWC25 #INDvAUS #2ndSemiFinal — BCCI Women (@BCCIWomen) October 30, 2025
ऑस्ट्रेलिया : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (यष्टीरक्षक/कर्णधार), एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.
भारत :शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौर, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.






