भारतीय तरुण Innovators चा जलवा!
भारतातील तरुण इनोव्हेटर्सने Samsung च्या राष्ट्रीय शिक्षण उपक्रम ‘सॉल्व फॉर टूमारो २०२५’ मध्ये आपल्या कल्पकतेचं आणि नाविन्यपूर्ण विचारांचं दर्शन घडवत उत्तुंग यश संपादन केलं आहे. या वर्षीच्या स्पर्धेत चार अव्वल टीम्सना एआय-आधारित उपाययोजना विकसित करण्यासाठी एकूण १ कोटी रुपयांचं इन्क्युबेशन अनुदान प्रदान करण्यात आलं.
सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आयोजित केलेल्या या उपक्रमात देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा उद्देश स्थानिक सामाजिक आव्हानांवर तंत्रज्ञानाचा वापर करून वास्तववादी सोल्यूशन्स तयार करणे असा आहे.
या वर्षीच्या चार विजेत्या टीम्स खालीलप्रमाणे आहेत:
या टीम्सना आयआयटी दिल्लीच्या FITT लॅब्समध्ये इन्क्युबेशन व मार्गदर्शन दिलं जाणार असून, त्यांचे प्रोटोटाइप्स प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे नेले जातील.
स्पर्धेतील अव्वल 20 टीम्सना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप स्मार्टफोन्स देण्यात आले. याशिवाय “गुडविल अवॉर्ड”, “यंग इनोव्हेटर अवॉर्ड” आणि “सोशल मीडिया चॅम्पियन अवॉर्ड” अशी विशेष पारितोषिके देखील जाहीर करण्यात आली.
या उपक्रमात स्टार्टअप इंडिया, MEITY स्टार्टअप हब आणि अटल इनोव्हेशन मिशन (नीती आयोग) यांचा बहुवार्षिक सहयोग आहे. निर्णायक मंडळात सॅमसंग नेतृत्वासोबत IIT, NITI Aayog आणि सरकारी वैज्ञानिक संस्थांचे तज्ञ सामील होते.
“सॉल्व फॉर टूमारोने भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना एकत्र आणत तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण घडवले आहे. या कल्पक तरुणांच्या कल्पना भारताच्या भविष्याला आकार देतील,” असे सॅमसंग साउथवेस्ट आशियाचे अध्यक्ष आणि CEO जे. बी. पर्क यांनी सांगितले.
यंदा द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमधून प्रबळ सहभाग दिसून आला. शाश्वतता, आरोग्य, एआय, आणि सामाजिक परिवर्तन यांसारख्या विषयांवर आधारित प्रकल्पांमधून तरुण भारताच्या सर्जनशीलतेचं दर्शन घडलं. सॅमसंग या उपक्रमाद्वारे देशातील नवप्रवर्तकांची पुढील पिढी घडवण्यास आणि भारतासाठी व जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाचे भविष्य घडवण्यास कटिबद्ध आहे.






