Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local: दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी लोकल ठप्प

Central Railway Update : मध्य रेल्वेच्या भांडूप आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान विक्रोळी परिसरात ओव्हरहेड विद्युत तारेवर प्लास्टिक अडकल्याने मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या तांत्रिक अडथळ्यामुळे मुंबईकडे धावणाऱ्या लोकल गाड्यांवर परिणाम झाला असून अनेक सेवा विलंबाने धावत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 06, 2026 | 12:47 PM
दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! विक्रोळी परिसरातील ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! विक्रोळी परिसरातील ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

Follow Us
Follow Us:
  • मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत
  • विक्रोळीजवळ ओव्हरहेड वायरवर प्लास्टिक पडल्याने वाहतूक ठप्प
  • भांडूप आणि कांजूरमार्ग स्टेशनमधील घटना
  • मुंबईकडील वाहतूक ठप्प, तर ठाणे-कल्याणच्या दिशेने सेवा व्यवस्थित
Mumbai Local News Update : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली असताना, आता मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान मध्य रेल्वेच्या मुंबईकडे येणाऱ्या लोकल वाहतुकीवर सोमवारी आणखी एक अडथळा निर्माण झाला. भांडूप आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान विक्रोळी परिसरात ओव्हरहेड वायरवर (Overhead Equipment – OHE) प्लास्टिक अडकल्याने काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

Karjat Lonavala Landslide: मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका; कर्जत-खोपोली लोकल सेवा ठप्प, इतर मार्गांवर विलंब

या तांत्रिक अडथळ्यामुळे मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या लोकल गाड्या ठप्प करण्यात आले आहे.परिणामी अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावू लागल्या आणि सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी धाव घेत ओव्हरहेड वायरवरील प्लास्टिक काढण्याचे काम तातडीने सुरू केले. सुरक्षितता लक्षात घेऊन काही काळ वाहतूक नियंत्रित करण्यात आली. अडथळा दूर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मुंबईकडे येणारी वाहतूक प्रभावित झाली असली तरी ठाणे-कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Local services halted between Kanjurmarg and Bhandup on slow line towards CSMT because of a Plastic stuck on OHE. The plastic is being removed by turning off OHE and services will be restored shortly. pic.twitter.com/LpmMmEHO1X — Central Railway (@Central_Railway) July 6, 2026

मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या विविध मार्गांवर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याआधी कर्जत-खोपोली मार्गावर रुळांखालची खडी वाहून गेल्यामुळे लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यातच विक्रोळी परिसरातील ही घटना घडल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना सलग दुसऱ्या मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा सोशल मीडिया हँडलवरून लोकल सेवेची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

मुसळधार पाऊस, प्रचंड गर्दी… अन् डब्यात शिरला ‘तो’ किळसवाणा पाहुणा; महिलांची उडाली एकच धांदल, Video Viral

Web Title: Central railway mumbai bound services disrupted vikhroli overhead wire plastic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • central railway
  • Monsoon Update
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mumbai Local : मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
1

Mumbai Local : मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Kalyan News : टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप
2

Kalyan News : टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

Nashik Rain Devendra Fadnavis : उद्या नाशिकसाठी धोक्याचा दिवस? 300 मिमी पावसाचा अंदाज, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
3

Nashik Rain Devendra Fadnavis : उद्या नाशिकसाठी धोक्याचा दिवस? 300 मिमी पावसाचा अंदाज, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

Karjat News : कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद
4

Karjat News : कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.