
सीईटी गुणपत्रिकेत फेरफार करणाऱ्या विद्यार्थ्याला दणका, विद्यार्थ्याचा अभियांत्रिकी प्रवेश न्यायालयाने केला रद्द
Ratnagiri News: कातळशिल्प संवर्धन आणि पर्यटनाला वेग! रत्नागिरीसाठी १४ कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा
अनधिकृत मार्गाचा अवलंब खपवून घेणार नाही
या प्रकरणात न्यायालय म्हणाले, “गुणवत्ता ठरवण्यासाठी आणि शिक्षणाच्या मर्यादित संधीचे वाटप करण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा ही अनिवार्यपणे परीक्षा प्रक्रियेची सचोटी आणि उमेदवारांनी सादर केलेल्या दस्तऐवजांची सत्यता यावर अवलंबून असते. गुण, पर्सटाइल किंवा गुणपत्रिकांमध्ये फेरफार करण्याचा कोणताही प्रयत्न, त्या प्रक्रियेच्या मूळ पायावरच घाला घालतो. हे विशेषतः दुर्दैवी आहे. जेव्हा असे वर्तन व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या संदर्भात घडते, जिथे शिक्षणाची संधी मिळवण्यासाठी गुणवत्ता हाच एकमेव आधार असणे अपेक्षित असते.”
Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!
‘व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची स्पर्धा तीव्र असू शकते, प्रवेशाचाबतची विद्यार्थ्यांची चिंता आणि कमी गुण किया पर्सटाइल मिळाल्यामुळे होणारी निराशा समजण्यासारखी आहे. मात्र, परीक्षेच्या निकालाचे परिणाम टाळण्यासाठी किंवा त्यातून मार्ग काढण्यासाठी अयोग्य किंवा अनधिकृत मार्गाचा अवलंब करणे कदापि खपवून घेतले जाऊ शकत नाही. प्रवेश कितीही हवासा वाटत असला, तरीही परीक्षेच्या नोंदींमध्ये फेरफार करण्याचे कृत्य समर्थनीय ठरू शकत नाही, असे न्यायालय म्हणाले. याचिकाकर्ता विद्यार्थ्यांने सीईटीच्या फेरफार केलेल्या गुणपत्रिकेच्या आधारावर पुणे येथील एका खासगी विद्यापीठात २३ जून २०२६ रोजी बी. टेक रिन्यूएबल एनजी इंजिनियरिंग अभ्यासक्रमाच्या (२०२६-२०३०) प्रथम वर्षासाठी तात्पुरता प्रवेश घेतला होता.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)