Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तलावातील लाखो लिटर पाणी वाया; शेतकऱ्यांचा संताप, कारवाईची मागणी

ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगाण येथील तलावाच्या कामात झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे परिसरातील सुमारे ५० हेक्टरवरील भातशेती संकटात सापडली असून ग्रामस्थांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2026 | 03:23 PM
Chandrapur News: कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तलावातील लाखो लिटर पाणी वाया; शेतकऱ्यांचा संताप, कारवाईची मागणी

Chandrapur News: कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तलावातील लाखो लिटर पाणी वाया; शेतकऱ्यांचा संताप, कारवाईची मागणी

Follow Us
Follow Us:
  • चौगाण तलावातून गेल्या पाच दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असून सुमारे ५० हेक्टर भातशेती धोक्यात आली आहे.
  • कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
  • शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय तातडीने थांबवून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
ब्रह्मपुरी: तालुक्यातील चौगान (गट क्र. २५२) येथील तलावाच्या आतील काम सुरू असताना कंत्राटदाराने पाणी अडवण्यासाठी लावलेले आवरण निष्काळजीपणे काढून टाकल्यामुळे गेल्या ५ दिवसांपासून तलावातील पाण्याचा प्रचंड अपव्यय सुरू आहे. तलाव पूर्ण भरल्याने आता दोन्ही मोरींमधून लाखो लिटर पाणी बाहेर वाहत असून, यामुळे परिसरातील सुमारे ५० हेक्टर क्षेत्रावरील धान (भात) शेती धोक्यात आली आहे.

कोयना धरणातून विसर्ग वाढला; कराडमध्ये नदीची पाणीपातळी 29 फुटांवर, प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

चौगाण येथील तलावाचे काम सुरू करण्यात आले. उन्हाळ्यात मोरीचे काम न करता, २० जुलैपासून कंत्राटदाराने भर पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात आणि वाहत्या पात्रात मोरीचे काम हाताळले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असताना लोखंडी सळ्या उभ्या करून कॉंक्रिटीकरण केले जात असल्याचे छायाचित्रांवरून स्पष्ट दिसत असून, हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम आहे, असा आरोप स्थानिक नागरीकांनी केला. मात्र याकडे दुर्लक्ष करीत काम सुरूच ठेवण्यात आले. त्यानंतर मुसळधार पावसास सुरूवात झाली. मात्र काम करण्यासाठी तलावाचे पाणी अडवून ठेवणारे आवरण कंत्राटदारांने बांधकामासाठी हटविले होते, ते पूर्ववत करण्यात आले नाही.

तलावातील पाणी बाहेर पडून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून गावातील भगवान प्रधान यांनी १ महिन्यापूर्वी कंत्राटदाराला ३ ते ४ वेळा फोन करून पाणी अडवणारे आवरण पूर्ववत बंद करण्याची विनंती केली होती. मात्र कंत्राटदाराने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. यानंतर जलसंधारण (ल.पा.) उपविभागीय अधिकाऱ्यांनाही २ ते ३ वेळा फोनवरून जाणीव करून दिली असता, त्यांनी फक्त करून देतो असे पोकळ आश्वासन दिले.

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा

अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळेच आज ५० हेक्टर शेतीवर संकट ओढवले आहे. याविषयी शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केले जात आहे. तलावाच्या दोन्ही मोरीतील पाण्याचा प्रवाह तत्काळ बंद करून ५० हेक्टर धान शेती वाचवावी आणि वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी! मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

माहिती दडपून वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना

सदर कामाच्या दर्जाबाबत शंका आल्याने सामाजिक कार्यकर्ते कृपाकर चहांदे यांनी ८ जून रोजी माहिती अधिकारांतर्गत अंदाजपत्रक मागितले होते. परंतु अधिकाऱ्यांनी ते दडपले. २२ जूनच्या च्या प्रथम अपीलावर कार्यकारी अभियंत्यांनी सुनावणीचे आदेश देऊनही ब्रम्हपुरी कार्यालयाने सुनावणी घेतली नाही. अखेर ३१ जुलै रोजी राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठात द्वितीय अपील दाखल करण्यात आली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Brahmapuri chougan lake water wastage 50 hectare paddy farming at risk chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

IndiGo News: काय सांगताय? पायलट बनला इंडिगोचा सीईओ? संकट काळात विली वॉल्श यांनी सांभाळली कमान, कोण आहेत हे अधिकारी?
1

IndiGo News: काय सांगताय? पायलट बनला इंडिगोचा सीईओ? संकट काळात विली वॉल्श यांनी सांभाळली कमान, कोण आहेत हे अधिकारी?

Mumbai Crime: इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळला 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; गूढ मृत्यूमुळे परिसरात खळबळ
2

Mumbai Crime: इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळला 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; गूढ मृत्यूमुळे परिसरात खळबळ

Haldiram London Restaurant : भारतातील प्रसिद्ध हल्दीराम लंडनमध्ये फेल? अवघ्या 25 दिवसांत शटर डाऊन, मोठं कारण समोर
3

Haldiram London Restaurant : भारतातील प्रसिद्ध हल्दीराम लंडनमध्ये फेल? अवघ्या 25 दिवसांत शटर डाऊन, मोठं कारण समोर

कोयना धरणातून विसर्ग वाढला; कराडमध्ये नदीची पाणीपातळी 29 फुटांवर, प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
4

कोयना धरणातून विसर्ग वाढला; कराडमध्ये नदीची पाणीपातळी 29 फुटांवर, प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.