
crime (फोटो सौजन्य: social media)
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तरुणांना रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवीत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये वसूल करीत फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणी ५० वर्षीय मुजिबूर लतीफ कुरेशी (रा. रहमतनगर बिनबा गेट), रवींद्र संभाजी वाघमारे (४५, रा. रामनगर) व सुरेंद्र रामकृष्णा तेलंग (५०, रा. नागपूर) यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत रामनगर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपी सध्या पसार आहेत.
अशी झाली फसवणूकः देशात
बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. नोकरीसाठी कुणी काहीही करण्यास तयार आहे. याचा लाभ घेत या बेरोजगारांना नोकरी देण्याचे आमिष चंद्रपुरातील मुजिबूर कुरेशी यांनी दिले. भारतीय रेल्वेत तिकीट चेकरच्या जागा असून त्याकरिता १० ते १५ लाख रुपये लागतील, जो आधी पैसे देणार त्याला नोकरीत सामावण्यात येईल, असे सांगितल्यावर बेरोजगार तरुणांनी पैशाची जुळवाजुळव सुरू केली. मुलाला नोकरी लागणार या आशेवर आई-वडिलांनी घर व शेत गहाण ठेवत कुरेशीला पैसे दिले.
यामध्ये चंद्रपुरातील पवन वाघमारे ८ लाख ५० हजार, कौस्तुभ आदे ८ लाख ५० -हजार, इक्राम शेख ९ लाख, विपीन गणवीर १० लाख, दिनेश अंडरस्कर १० लाख, अशोक सातपुते ८ लाख, रवींद्र वांढरे ८ लाख ८० हजार, घुग्यूसमधील नागराज अंबाला ६ लाख, अहेरी सिरोंचा हरीश अकुला १० लाख, पवनी, भंडारा गोपाल मुंडले ८ लाख ३० हजार, यवतमाळ शेख सय्यद ८ लाख ५० हजार, देसाईगंज अनुप शेंडे ७ लाख ५० हजार, भंडारा हरिहर मेश्राम ७ लाख ५० हजार, गंगाधर पेंड्याला मंचेरियल १० लाख व बल्लारशामधील इम्रान पठाण यांनी ११ लाख रुपये कुरेशी यांना वर्ष २०१४ मध्ये दिले होते.
पैसे मिळाल्यावर कुरेशी यांनी सर्व तरुणांना नागपुरात बोलाविले, सर्वांना विमानाने कोलकातामध्ये नेण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सुरेंद्र तेलंग (रा. नागपूर) व रवींद्र संभाजी वाघमारे (रा. चंद्रपूर सिस्टर कॉलोनी) हे सोबत होते. कोलकातामध्ये पोहोचल्यावर तरुणांना हॉटेलमध्ये नेण्यात आले. काही दिवसांनी एका रूमवर नेले, त्यानंतर सर्व तरुणांना विविध ठिकाणी फिरविण्याची काम केले.
टीसीसाठी प्रशिक्षण घ्यायचे आहे, असे सांगत वेगवेगळ्या ट्रेनिंग स्कूलमध्ये तरुर्णाना नेले, पोलिस व्हेरीफिकेशनचे पत्र तरुणांना दिले, तब्बल दीड वर्षे कोलकात्यामध्ये राहिल्यावर त्यांची नियुक्ती झाली नाही, तरुणांना दिलेले नियुक्ती पत्र पूर्णतः बोगस होते. आपली फसवणूक झाली, असे लक्षात येताच त्यांनी कुरेशी, स तेलंग व वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
१ कोटी ३१ लाखांनी फसवणूक
कुरेशी कारागृहातून बाहेर आल्यावर त्याला पैसे परत देण्याची विनवणी तरुणांनी केली, मात्र, तो दरवेळी पैसे देतो काही काळ थांबा, असे म्हणत होता, काही दिवसांनी कुरेशीने सर्वांना बँकेचा धनादेश दिला, मात्र तो धनादेश पैसे नसल्याने वटला नाही. जानेवारी महिन्यात वर्तमानपत्रात सरकारी नौकरी घोटाळा ६ राज्यात धाडी असे वृत्त प्रकाशित झाले, त्या प्रकरणाचा कुरेशी सोबत संबंध होता. आता गप्प बसायचे नाही म्हणत तरुणांनी कुरेशी विरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. कुरेशी यांनी १५ बेरोजगार तरुणांकडून एकूण १ कोटी ३१ लाख ६० हजार रुपयांनी फसवणूक केली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी मुजिबूर लतीफ कुरेशी, रवींद्र संभाजी वाघमारे व सुरेंद्र रामकृष्ण तेलंग यांच्यावर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल केला, आरोपी सोबत अजून या रॅकेटमध्ये कुणाचा सहभाग आहे का, याबाचत पुढील तपास सुरू आहे.
कुरेशी सापडला नांदेड जिल्ह्यातील कारागृहात
आपण आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, याच दुःख मनात ठेवत तरुण गावी परतले, आमचे पैसे परत द्या, अशी मागणी तरुणांन तेलंगला केली. मात्र, तुमचे पैसे परत मिळणार नाही रेल्वेत नोकरी मिळाली नाहीतर घाबरू नका इतन सरकारी विभागात आपण प्रयत्न करू, पण पैसे परत मिळणार नाही. त्यानंतर तरुणांनी फसवणुकीची बाळ आई-वडिलांना सांगितली नाही, कुरेशीचा संपर्क होत नसल्याने तरुणांनी अधिक माहिती काढली असत कुरेशी फसवणुकीच्या प्रकरणात मागील वर्षभरापासून नांदेड जिल्ह्यातील कारागृहात होता.
Odisha Crime: संतापजनक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर ५ नराधम शिक्षकांकडून सामूहिक बलात्कार, ओडिशातील घटना
Ans: 15 बेरोजगार तरुणांची.
Ans: एकूण ₹1.31 कोटींहून अधिक.
Ans: भारतीय रेल्वेत टीसी पदावर नोकरी.