Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; जिल्ह्यात ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण

चंद्रपूर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण झाले आहे. अद्याप गणना प्रपत्र जमा न केलेल्या मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह ते १७ ऑगस्टपर्यंत संबंधित BLO कडे जमा करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 08, 2026 | 03:10 PM
Chandrapur News: मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; जिल्ह्यात ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण

Chandrapur News: मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; जिल्ह्यात ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूर जिल्ह्यातील ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण झाले आहे.
  • एसआयआर मोहिमेसाठी भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
  • जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, ब्रह्मपुरी आणि चिमूर मतदारसंघांमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले आहे.
चंद्रपूर: भारत निवडणूक राज्यात आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ९९.६९ टक्के मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्यासाठी ही मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण १७ लाख ९७ हजार ६५५ मतदारांपैकी बुधवारपर्यंत १७ लाख ९७ हजार ०२७ मतदारांना (९९.९७टक्के) गणना प्रपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी १७ लाख ९२ हजार १३३ मतदारांचे डिजीटायझेशन पूर्ण झाले आहे.

Raigad News: नेरळ ग्रामसभेत १६ व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला विरोध; आधी १५ व्या वित्त आयोगाच्या कामांचा हिशेब द्या, ग्रामस्थांची

भारत निवडणूक आयोगाने एसआयआर कार्यक्रमासाठी १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या मतदारांनी अद्याप गणना प्रपत्र भरून जमा केलेले नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे ते १७ऑगस्टपर्यंत जमा करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २०७६ बीएलओ नियुक्त करण्यात आले असून, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेतला असता, ७०-राजुरा, ७२-बल्लारपूर, ७३-ब्रह्मपुरी आणि ७४-चिमूर या चार मतदारसंघांमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर ७५ वरोरा मतदारसंघात ९९.८१ टक्के आणि ७१-चंद्रपूर मतदारसंघात ९८.६३ टक्के काम पूर्ण झाले आहे.

असा आहे कार्यक्रम

  • बीएलओमार्फत घरोघरी भेटी: ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६
  • मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना : १७ ऑगस्ट २०२६
  • प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी : २४ ऑगस्ट २०२६
  • दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६
  • दावे व हरकती निकाली काढणे: २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६
  • अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी: २७ ऑक्टोबर २०२६
Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

एसआयआर मोहिमेंतर्गत मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. ज्या मतदारांनी अद्याप गणना प्रपत्र जमा केलेले नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित बीएलओकडे सादर करावे. तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी (बीएलए) या प्रक्रियेत सहकार्य करावे. त्रुटीरहित आणि अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी नागरिकांनी निवडणूक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur voter list sir update 9969 percent digitisation completed check last date to submit forms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

All The Best : महाराष्ट्र गाजवल्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’चा डंका सातासमुद्रापार, तारखा जाणून घ्या…
1

All The Best : महाराष्ट्र गाजवल्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’चा डंका सातासमुद्रापार, तारखा जाणून घ्या…

Tax Relief On Medical Bills: ऑफिसने रुग्णालयाचा खर्च नाकारला? इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करा असा दावा; पाहा कसा होईल फायदा
2

Tax Relief On Medical Bills: ऑफिसने रुग्णालयाचा खर्च नाकारला? इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करा असा दावा; पाहा कसा होईल फायदा

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी
3

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय
4

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.