Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये सध्या एकूण ५५.८५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 24, 2026 | 02:02 PM
Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Follow Us
Follow Us:
  • जलसाठा कमी — चंद्रपूरमधील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये सध्या केवळ 55.85 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
  • शेतीवर परिणाम — पावसातील खंडामुळे कापूस, सोयाबीन, धान आणि तूर पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • पाणीटंचाईचे सावट — जलसाठा पुरेसा न वाढल्यास भविष्यात शेतीसोबतच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाची अनियमितता आणि अपेक्षेप्रमाणे पर्जन्यमान न झाल्याचा परिणाम जलसाठ्यावर दिसून येत आहे. जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये सध्या एकूण ५५.८५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्याचा कालावधी सुरू असतानाही प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

जिल्ह्यातील असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभासराड, लालनाला, अंमलनाला, पकडीगुड्डम, डोंगरगाव आणि इराई या प्रमुख प्रकल्पांवर सिंचन, पिण्याचे पाणी तसेच विविध गरजा मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. या प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण होणे हे जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, यंदा पावसाने सातत्य न राखल्याने जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. यंदाच्या पावसाळ्यात जिल्हाभरात दीर्घकाळ पावसाने दडी मारली. परिणामी जलप्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा झाला नाही. पावसाच्या या लहरीपणाचा थेट परिणाम शेती आणि भूजलपातळीवरही होण्याची शक्यता आहे.

जलप्रकल्पांमधील पाणीसाठा कमी राहिल्यास केवळ शेतीच नव्हे, तर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निमर्माण होऊ शकतो. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेल हे पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा न झाल्यास परिणाम भूजलपातळीवरही त्याचा होण्याची शक्यता आहे. जलसाठ्याची ही स्थिती पाहता प्रशासनाने आतापासूनच पाणी नियोजन, उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर व्यवस्थापन आणि संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामावर टांगती तलवार

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून आहेत. कापूस, सोयाबीन, धान, तूर यासह विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसातील खंडामुळे पिकांना आवश्यक त्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आगामी काळात पावसाने साथ दिली नाही, तर पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

FSSAI परवाना नसल्याची कबुली, दोन रुग्णालयांतील कॅन्टीन बंद; रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

प्रकल्पनिहाय जलसाठ्याची टक्केवारी

  • पकडीगुडुम ९६.४९
  • डोंगरगाव ८९.४६
  • लभासराड ७५.३५
  • इराई ७४.५०
  • चारगाव ७१.१४
  • अंमलनाला ६९.४२
  • नलेश्वर ५१.३९
  • लालनाला ४८.९१
  • चंदई ४७.९८
  • असोलामेंढा ४३.७४
  • घोडाझरी ३३.९५

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur water crisis reservoirs at just 5585 capacity as irregular rainfall raises farmers concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Karjat: मिरचोलीत आदिवासी जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप; बेकायदेशीर कंपाऊंड हटवण्याची मागणी
1

Karjat: मिरचोलीत आदिवासी जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप; बेकायदेशीर कंपाऊंड हटवण्याची मागणी

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला
2

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral
3

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral

Electric Car Servicing: सर्व्हिसिंगचा खर्च पाहून डोकं फिरलं! पठ्ठ्याने घरीच दुरुस्त केली EV कारची बॅटरी
4

Electric Car Servicing: सर्व्हिसिंगचा खर्च पाहून डोकं फिरलं! पठ्ठ्याने घरीच दुरुस्त केली EV कारची बॅटरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.