
मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Mumbai Local Viral Video: मुंबईची लाईफलाईन म्हटलं की, डोळ्यांसमोर येते की म्हणजे लोकल रेल्वे. दररोज लाखो नागरिकांना आपल्या आवडत्या स्थळी नेऊन सोडते. गर्दी, धावपळ आणि सततची लगबग यामध्ये मुंबईकरांचा दिवस लोकल प्रवासाशिवाय पूर्ण होत नाही. मात्र आता याच लोकमधील एका व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. बोरिवली ते विरार या मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये एका महिलेकडून बोम्बील माशांवर रंग लावला जात असल्याचे दिसत आहे. Video Viral
मुंबईला कोळी बांधवाची नगरी असं म्हटलं तर, वागंव ठरणार नाही. सर्वात जास्त मासे खाणारे खवय्ये मुंबईमध्ये पाहायला मिळतील. पण आता ते मासे आपला जीव तर घेणार नाही ना? असा प्रश्न सध्या उपस्थितीत केला जात आहे. बोरिवली ते विरार या मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये बोबींल मासे ताजे दिसावे म्हणून त्याला कृत्रिम रंग लावताना दिसत आहे. हा सादर प्रकार माल डब्यांतला असल्याचं सांगण्यात आले आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अन्नपदार्थ आकर्षक दिसावेत म्हणून तुम्ही त्यांच्या असे कृत्रिम रंगाचा उपयोग करु शकाल का? असा सवाल आता नागरिकांनी उपस्थितीत केला आहे. वापरलेल्या रंगामध्ये नेमके कोणते रसायन आहे, त्याचा माशांवर वापर करण्यास परवानगी आहे का आणि असे मासे खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होतो का, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे गरजेचे आहे. केवळ व्हिडिओच्या आधारे रंग विषारी असल्याचे निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे संबंधित नमुने तपासणे आणि त्यानंतरच निष्कर्ष काढणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. जर खाद्यपदार्थांमध्ये नियमबाह्य पद्धतीने रंग मिसळला जात असल्याचे तपासात आढळले, तर संबंधित व्यक्तीवर नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे.
A viral video allegedly shows a woman colouring Bombil fish to make it appear fresh while selling it on a Borivali-Virar local train. The incident date is unknown. Netizens have raised food safety concerns and demanded an investigation by railway authorities and the FDA. pic.twitter.com/5Dza7wtLnJ — Mid Day (@mid_day) August 24, 2026
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ऑगस्ट २०२६ मध्ये तुकाराम मुंढे यांची आयुक्त केली. मुंढेंच्या राज्यभरात अनेक मोठ्या कारवाई केल्या. या मोहिमेअंतर्गत ३,१३७ पेक्षा जास्त तपासण्या करण्यात आल्या असून सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक कंपन्यांचे परवाने रद्द आणि निलंबित करण्यात आले आहेत.