Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?
सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीनंतर गावागावांत संभाव्य उमेदवारांच्या हालचाली वाढल्या असून, स्थानिक पातळीवर बैठका, गटबाजी आणि राजकीय चर्चाना वेग आला आहे. इच्छुकांकडून आपल्या गटातील योग्य उमेदवाराचा शोध सुरू झाला असून, काही ठिकाणी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
जांभुळघाट, पांजरेपार, खडसंगी, केवाडा, मोकासा, अमरपुरी, लावारी मरार, हिरापूर, चिचोली, चक जांभूळविहीरा, पारडपार, महालगाव काळू, वाघेडा, आमडी, बोडधा, साठगाव आदी ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणामुळे स्थानिक राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेक गावातील इच्छुकांना आता आपली राजकीय रणनीती नव्याने आखावी लागणार आहे. ज्या गटातील संभाव्य उमेदवाराला आरक्षणाचा फटका बसला आहे, त्या ठिकाणी पर्यायी उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. दुसरीकडे महिला आरक्षण लागू झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये इच्छुक महिलांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाचे आरक्षण हा महत्त्वाचा घटक ठरणार असून, कोणत्या गावात कोणत्या राजकीय गटाला फायदा होतो आणि कोणाला धक्का बसतो, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आरक्षणानंतर बदललेल्या समीकरणांचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर कितपत होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग : कोलारा, आंबोली, नवतळा, कपर्ला खुर्द, बोथली, सिरसपूर आदी ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गात आल्या आहेत.
सर्वसाधारण महिला : चिचाळा शास्त्री, कन्हाळगाव, शंकरपूर, पळसगाव, सिरसपूर, किंटाळी मक्ता, म्हसली, मासळ, हिवरा, कोलारी, पिंपळगाव, मेटेपार, गडपिपरी, पिपर्डा, शिवरा, आंबेनेरी, बोरगाव खुर्द, येरखेडा, नंदारा, सावरगाव व वाकर्ता आदी ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.






